शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

बुधवार ठरला कोरोनाचा स्थिरवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या आतापर्यंत जिल्ह्यातील १०५५ जणांचे स्वॅब नमुने घेवून नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६९ नमुने पॉझिटिव्ह आले असून २५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. तर आत्तापर्यंत एकूण ९६१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.

ठळक मुद्देनवीन रुग्णाची नोंद नाही : २५ स्वॅब नमुन्यांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा ६९ वर पोहचला आहे. मात्र आत्तापर्यंत एकूण ५० कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत १९ कोरोना बाधीत अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. बुधवारी (दि.४) जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही तसेच एकही रूग्ण कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे बुधवार दिवस जिल्हावासीयांसाठी कोरोनाचा स्थिरवार ठरला.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्यांची सीमा तपासणी नाक्यावरच आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात यश आले आहे.कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही प्रामुख्याने ग्रामीण भागातच अधिक असल्याने प्रशासनासह जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. बुधवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झाली नाही.कोरोना संसर्गाच्या आतापर्यंत जिल्ह्यातील १०५५ जणांचे स्वॅब नमुने घेवून नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६९ नमुने पॉझिटिव्ह आले असून २५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. तर आत्तापर्यंत एकूण ९६१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.जिल्ह्यात २४ क्रियाशील कंटेन्मेंट झोनकोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रशासनातर्फे कंटेन्मेंट झोन घोषीत करुन तो परिसर सील केला जातो. सध्या स्थितीत जिल्ह्यात २४ क्रियाशील कंटेन्मेंट झोन आहेत. यात गोंदिया तालुक्यात नवरगाव कला, कटंगी, परसवाडा, चुटीया, रजेगाव व गजानन कॉलनी, काटी, सालेकसा तालुक्यात धनसुवा व बामणी, सडक अर्जुनी तालुक्यात तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव, पांढरवाणी, गोपालटोली, गोरेगाव तालुक्यात गणखैरा, गोरेगाव येथील गंगाराम चौक, आंबेतलाव, तिरोडा तालुक्यातील तिरोडा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील करांडली, अरुणनगर, सिलेझरी, बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध शाळा आणि संस्थामधील क्वारंटाईन केंद्रात २७०२ जण दाखल आहेत. तर होम क्वारंटाईनमध्ये २२१६ जण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या