‘स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांची प्रेरणा’ विषयावर वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:01+5:302021-03-31T04:29:01+5:30

उदघाटन धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून महसूल एकात्मता संचालनालय ...

Webinar on 'Motivation of Students for Competitive Exam Preparation' | ‘स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांची प्रेरणा’ विषयावर वेबिनार

‘स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांची प्रेरणा’ विषयावर वेबिनार

उदघाटन धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून महसूल एकात्मता संचालनालय (गोवा) उपसंचालक अश्विन उके व उडान केंद्राचे संयोजक प्रा. धर्मवीर चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. नायडू यांनी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे वचनबद्धता, कठोर परिश्रम आणि समर्पण असणे आवश्यक आहे. मोठी स्वप्ने बघून विद्यार्थ्यांनी परिश्रम केले तर यशाचे शिखर गाठणे शक्य होते असे मत व्यक्त केले.

उके यांनी, स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या विविध संस्थांची व संघ लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपात भविष्यात होणारे बदल काय आहेत यावर सुद्धा मार्गदर्शन केले.

तसेच या परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम करण्याची गरज आहे असे सांगितले. संचालन करून आभार प्रा. चव्हाण यांनी मानले. व्याख्यानात २५० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी प्रा. संजय तिमांडे, डाॅ. दिलीप चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Webinar on 'Motivation of Students for Competitive Exam Preparation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.