इतर गावांना प्रेरणास्पद गाव बनवू

By Admin | Updated: December 7, 2014 22:54 IST2014-12-07T22:54:02+5:302014-12-07T22:54:02+5:30

तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात ग्राम स्वच्छता अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिदिन व जागतिक अपंग सप्ताहाची सांगता शनिवारी ६ डिसेंबरला करण्यात आली. यावेळी तिरोडा

We will make other villages an inspiring village | इतर गावांना प्रेरणास्पद गाव बनवू

इतर गावांना प्रेरणास्पद गाव बनवू

सर्वधर्मसमभाव : ग्राम स्वच्छता अभियान व अपंग सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची रॅली
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात ग्राम स्वच्छता अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिदिन व जागतिक अपंग सप्ताहाची सांगता शनिवारी ६ डिसेंबरला करण्यात आली. यावेळी तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश टेंभरे यांनी इतर गावांना प्रेरणा घ्यावीच लागेल, असे आदर्श चिरेखनी गाव बनवू, असा निर्धार व्यक्त केला.
प्रत्येक महिन्यात गावात स्वच्छता अभियान राबवू, असा निर्धार व्यक्त करणाऱ्या चिरेखनीच्या ग्रामस्थांनी ६ डिसेंबरला दुसऱ्यांदा गावात स्वच्छता अभियान राबविले. सर्वप्रथम सकाळी ७ वाजता ग्राम स्वच्छता अभियानाची सुरूवात हनुमान मंदिरापासून करण्यात आली. यानंतर वार्ड-३, नंतर वार्ड-१ व यानंतर वार्ड-२ मध्ये स्वच्छता करून सर्व ग्रामस्थांनी गावातील केरकचरा व घाण स्वच्छ करून दोन ट्रॉल्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली. यानंतर नालंदा बुद्ध विहार व जि.प. पूर्व माध्यमिक शाळा परिसरातील केरकचरा व घाण स्वच्छ करण्यात आली. यावेळी गाव स्वच्छ, सुंदर व आजारमुक्त रहावे यासाठी सर्वच ग्रामस्थांनी सदर अभियानात पुढाकार घेवून आपण जागृत नागरिक असल्याचे दर्शन घडवून दिले. यात प्रामुख्याने कृउबासचे संचालक रमेश टेंभरे, सुरेंद्र कोटांगले, भोजराज पटले, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवचंद रिनाईत, तिरोडा पं.स. चे सभापती ललिता जांभूळकर, अंतुलाल पारधी, इंदल बिसेन, गेंदलाल पारधी, उदेलाल पारधी, गोपीचंद रिनाईत, माजी सरपंच उमेंद्र पारधी, घनश्याम जांभूळकर, भावराव कोटांगले, उपसरपंच सोनू पारधी, सुभाष जांभूळकर, खेमू रिनाईत आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.
यानंतर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा चिरेखनीच्या वतीने ३ ते ९ डिसेंबरपर्यंत असलेल्या अपंग सप्ताहानिमित्त गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. विविध घोषणा देत विद्यार्थ्यांची रॅली नालंदा बुद्ध विहार ते हनुमान मंदिर व शिवमंदिराकडून शाळेत परतली. यानंतर शाळेत विद्यार्थ्यांना अपंग सप्ताह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य या दोन्ही विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. लहानसहान विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. यावेळी पं.स. सभापती ललिता जांभूळकर, सरपंच जगन्नाथ पारधी, मुख्याध्यापक कटरे, शिक्षक मनोज गेडाम, मनोज जांभूळकर, व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक उपस्थित होते.
यानंतर सायंकाळी ६ वाजता नालंदा बुद्धविहारात गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक शहारे होते. अतिथी म्हणून पं.स. सभापती ललिता जांभूळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवचरण शहारे, डॉ. मेकचंद शहारे, दलितमित्र प्रल्हाद जांभूळकर, प्रमोद शहारे, भावराव कोटांगले, ग्रा.पं. सदस्य करूणा जांभूळकर, शिक्षक शैलेंद्र कोचे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सुरेंद्र कोटांगले, घनश्याम जांभूळकर, सुभाष जांभूळकर, किशोर सरोजकर, सुखचंद जांभूळकर, आशिष शहारे, सर्व समाजबांधव व ग्रामस्थांनी सहकार्य केले. सदर तिन्ही कार्यक्रमात गावकरी बंधू-भगिनींनी एकत्र येऊन सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून दिला. (प्रतिनिधी)

Web Title: We will make other villages an inspiring village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.