पोकळ आश्वासने देणारे नव्हे तर आम्ही कृती करणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST2021-09-18T04:31:29+5:302021-09-18T04:31:29+5:30
गोंदिया : शेतकऱ्यांना सलग दोन वर्षे बोनस देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केले. कोविड संक्रमणाच्या काळात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी ...

पोकळ आश्वासने देणारे नव्हे तर आम्ही कृती करणारे
गोंदिया : शेतकऱ्यांना सलग दोन वर्षे बोनस देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केले. कोविड संक्रमणाच्या काळात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ऑक्सिजन, इंजेक्शन व औषधींचा साठा कमी पडू नये यासाठी प्रयत्न केले. गोंदिया सुजलाम सुफलाम होण्यासाठी व जल सिंचनासाठी प्रयत्न सुरू आहे. काटी-रजेगाव उपसा सिंचन प्रकल्प लवकरच सुरू होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत होईल. आपण केवळ पोकळ आश्वासन देत नसून प्रत्यक्ष काम मार्गी लावून कृती करणारे आहोत, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम गर्रा खुर्द येथे गणेश बरडे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि.१७) आयोजित पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. खा. पटेल म्हणाले, आपण सत्तेत असो नसाे, पद असो वा नसो पण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या विकासाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगितले. याप्रसंगी परिसरातील कार्यकर्ता व नागरिकांसोबत त्यांनी विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी महेश चौधरी, आशा चौधरी, डॉ. बावनकर, गुलाब पंधरे, रमेश कटरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे पटेल यांनी पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, देवेंद्रनाथ चौबे, विनोद हरिणखेडे, गणेश बरडे, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, केतन तूरकर, विशाल शेंडे, रजनी गौतम, माया कोल्हे, उषा बरडे, गोविंद तुरकर, कुलदीप पटले, आशिष मिश्रा, प्रेमलाल काटेवार, घनश्याम मस्करे, मनोज दहीकर, चंदन गजभिये, महेंद्र गेडाम, शैलेश वासनिक, सुनील पटले, खेमराज बागडे, माणिकचंद मशे, पंकज तुरकर, विक्रांत तुरकर, उषा मेंढे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी, कार्यकर्ता व गावकरी उपस्थित होते.