‘कोकिळ’ नामशेष होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: April 28, 2016 01:42 IST2016-04-28T01:42:40+5:302016-04-28T01:42:40+5:30
वसंत ऋतूत कानी पडणारा सुमधूर व मन प्रसन्न करणारा कोकिळेचा आवाज सर्वांना भुरळ घालत असतो.

‘कोकिळ’ नामशेष होण्याच्या मार्गावर
गोंदिया : वसंत ऋतूत कानी पडणारा सुमधूर व मन प्रसन्न करणारा कोकिळेचा आवाज सर्वांना भुरळ घालत असतो. रोज सकाळी कानावर पडणारा हा आवाज सायंकाळी ७ वाजेपर्यंत ऐकावयास मिळत असल्याने रुक्ष वाटणाऱ्या उन्हाळ्यात या स्वरामुळे आनंद मिळत असल्याने मन आल्हाददायक असते. मात्र मंजूळ आवाजाचा हा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
‘कपुकयुलिडी’ कुळातील कोकिळ पक्षी भारतात आढळतो. कावळ्याएवढाच पण थोडा सडपातळ असणाऱ्या या पक्ष्याचे सध्या सर्वत्र दर्शन होत आहे. जसजसा दिवस चढत जातो तसतसा कोकिळेच्या स्वराला साज चढतो. ग्रामीण भागात रस्त्याचच्याकडेला वड, पिंपळ व अमराईतून येणारा कोकिळेचा मधूर स्वर अनेकांना भूरळ घालत आहे.
कोकिळ पक्ष्यांचे वैशिष्टय म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच तिला कुठ फुटतो आणि ती गाऊ लागतो. श्रावण महिन्यापर्यंत तिचे गाणी ऐकू येते. हिवाळ्यात मात्र हा पक्षी मौन बाळगतो. मादी कोकिळेला गाता येत नाही. तर कोकिळा हा त्याचा पंचम स्वरामुळे अत्यंत लोकप्रिय व आवडता पक्षी आहे. पंचम स्वरातील कोकिळेची आर्तता ऐकणाऱ्याला दुभावते.
गितकारांनी व लावणी लिहिणाऱ्यांनी कोकिळ पक्षावर भरभरुन लिहिले आहे. कवी व लेखकांनी आपल्या साहित्यातून कोकिळेचा मधूर स्वर व प्रभाव याचे वर्णन केले आहे. हिंदी या मराठी चित्रपटगीतात कोकिळेच्या मधूर स्वराचा गोडवा गायीला जातो.
या पक्षाचे दुसरे वैशिष्टय म्हणजे हा पक्षी अधीही आपले घरटे बांधत नाही. मादा कोकिळ कावळ्याच्या घरट्यात अडी घालते व त्याच घरट्याजवळ लपून बसते. कोकिळ व कावळा यांचे वैर असल्याने कावळा त्यावर तुटून पडतो. तेव्हा कोकिळा कावळ्याला हुलकावण्या देत कावळ्याला घरट्यापासून दूर नेते. यादरम्यान मादा कोकिळ कावळ्याच्या घरट्यात अंडे पाहून तर कोकिळेला काम फत्ते झाल्याचे कळते. अशा प्रकारे कोकिळ कावळ्याचा खेळ चालतो.
पिलं बाहेर पडल्यावर कावळेच कोकिळेच्या पिलाचे पालन करतात. पिल्ले जगण्यास सक्षम झाली की, मग त्यांचा कावळ्यांशी संबंध राहत नाही, ती उडून जातात. ग्रामीण भागात कोकिळेचा मधूर स्वर नेहमीच निनादतो.
प्रदूषणांचा फटका कोकिळ पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याची चिंता पक्षीप्रेमींना लागली आहे. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या कोकिळांच्या प्रमाणामुळे जनता आता तिच्या मंजूर स्वरांच्या आस्वादाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)