लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपला तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे रोवणी खोळंबल्या असून केलेली रोवणी सुध्दा आता वाळण्याच्या मार्गावर आहेत. रोवणीसाठी गोंदिया तालुक्यातील तेढवा-शिवणी, रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना आणि इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले.हे पाणी गुरूवारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तेढवा-शिवनी व रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यात भूमिगत पाईपलाईनचे जाळे तयार करुन तालुक्यातील विविध गावांमध्ये सिंचनाची सोय करण्यात आली. नदीपात्रात असलेला गाढ, अनियमित विद्युत पुरवठा, प्रकल्पात असणाºया तांत्रिक अडचणीमुळे शेतकºयांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्यास अडचण निर्माण होत होती.यासंबंधी शेतकऱ्यांनी आ. विनोद अग्रवाल यांना निवेदन दिले होते. विदर्भ पाटबंधारे विभाग गोंदियाच्या अधिकाºयांशी संपर्कसाधून दोन्ही प्रकल्पांना कार्यान्वीत करण्यात आले. त्यावर प्रकल्प अभियंता, शाखा अभियंता व इतर पदाधिकारी यांनी पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर केल्या. अखेर प्रकल्प सुरू झाला. मात्र काही तासातच पुन्हा विद्युत पुरवठ्यामध्ये अनियमितता असल्याने तसेच कमी दाबाचे विद्युत पुरवठा असल्याने मोटार वारंवार बंद पडत होते. त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला.त्यानंतर व्होल्टेज दाब वाढवून प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर नदीतील गाळ, तांत्रिक अडचणी, विद्युत पुरवठा असल्या विविध समस्यांना सामोरे जात अखेर दोन्ही प्रकल्पात सातत्य आले असून शेतकऱ्यांच्या बांधवांवर पाणी पोचले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तेढवा-शिवणी योजनेचे पाणी पोहचले बांधापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST
सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तेढवा-शिवनी व रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यात भूमिगत पाईपलाईनचे जाळे तयार करुन तालुक्यातील विविध गावांमध्ये सिंचनाची सोय करण्यात आली.
तेढवा-शिवणी योजनेचे पाणी पोहचले बांधापर्यंत
ठळक मुद्देरोवणीसाठी मदत : पाऊस लांबल्याने समस्या, प्रकल्पावर भिस्त