शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात पाणी पेटले

By admin | Updated: May 6, 2015 00:56 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील आता बहुतेक गावांत पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी तालुक्यातील आता बहुतेक गावांत पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पाण्याची पातळीच खोलात गेल्याने अनेक विहिरी आटल्या असून कित्येक बोअरवेल्समधून पाणी निघतच नाही. तालुक्यातील वडेगाव, परसोडी, डोंगरगाव-खजरी, तिडका, परसोडी, पुतळी, केसलवाडा, चिखली, कनेरी, कोकणा-जमी, चिंगी, खोबा, सौंदड, हेटी, कोसमतोंडी, पांढरी, डुंडा, घोटी, रेंगेपार, चिरचाडी, जांभळी, दोडके, मसरामटोला, शेंडा, पुतळी, सहाकेपार, कोयलारी, डुग्गीपार, बाम्हणी, खडकी, मोगरा, दल्ली, कन्हारपायली, बिंद्राबन, म्हसवाणी, बोथली, बकी, सडक-अर्जुनी, कोहळीटोला, तिडका, सालेधारणी आदी गावातील पाण्याची पातळी खोलात गेली आहे. त्यामुळे विंधन विहिरी व सार्वजनिक विहिरींत पाणी नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात ६३ ग्राम पंचायती आहेत. नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी शासकीय विंधन विहीर ८४४ आहेत. त्यापैकी ४२ विंधन विहिरींना पाणी नसल्यामुळे बंद पडल्या आहेत. सार्वजनिक विहिरी ३७६ आहेत. त्या विहिरींपैकी ४५ विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे ३४ पंप सेट आहेत. त्यापैकी दोन पंप सेट बंद पडले आहेत. लघु नळ योजना २१ असून सर्वच सुरू आहेत. त्यापैकी बहुतेक लघु नळ योजनांच्या विंधन विहिरींना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी पुरेसा मिळत नाही. त्यामुळे गावातील बहुतेक नागरिकांना दोन ते चार बादली पाणी घेऊन समाधान मानावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील पुतळी व बाह्मणी येथील पाणी पुरवठा योजनेंतर्गत वर्षभरही शुध्द पिण्याचे पाणी जनतेला मिळू शकले नाही. त्या दोन्ही गावांतील पाणी पुरवठा योजना पूर्ण बंद पडल्या आहेत. या योजना बंद पडल्यामुळे चोरट्यांनी मोटार पंप, पाईप, खांब लाईट आदी महागडी वस्तू लंपास केल्याचे दिसत आहे. या योजनेकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे व पदाधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. या दोन्ही योजना खऱ्या अर्थाने सुरू राहिल्यास सडक-अर्जुनी तालुक्यातील पाणी समस्या संपुष्ठात येवू शकते. (शहर प्रतिनिधी)