वीज पुरवठ्याअभावी ‘जलसंकट’ ओढविणार
By Admin | Updated: July 15, 2016 02:11 IST2016-07-15T02:11:53+5:302016-07-15T02:11:53+5:30
चांदपुर जलाशयात बावनथडी नदी पात्रातून सोंड्याटोला प्रकल्पाद्वारे पाणी उपसा करण्याचा कालावधी सुरू झाला आहे.

वीज पुरवठ्याअभावी ‘जलसंकट’ ओढविणार
चुल्हाड (सिहोरा) : चांदपुर जलाशयात बावनथडी नदी पात्रातून सोंड्याटोला प्रकल्पाद्वारे पाणी उपसा करण्याचा कालावधी सुरू झाला आहे. खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी शासनाला पावसाळा संपल्यानंतर वीज पुरवठा सुरू करणार कां, असा संतप्त सवाल केला आहे.
सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यासाठी युती शासनाच्या काळात बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प मंजुर करण्यात आला. या प्रकल्पाने नदी पात्रातून उपसा करण्यात आलेले पाणी चांदपुर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. बावनथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाळ्यात प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. जुलै महिन्यात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात येते.
परंतु यंदा या प्रकल्पाचे भवितव्य व चित्र उलटे झाले आहे. वीज बिलाचे देयक करण्यात आले नसल्याने गेल्या वर्षापासून प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे.
पावसाने चांदपुर जलाशय भरण्याची आशा मावळली आहे. ३५-४० कि़मी. अंतरपर्यंत लांब असणाऱ्या लाभनडोह नाल्यावर जागोजागी सिमेंट प्लग बंधारे बांधण्यात आले आहे. यामुळे जलाशयात येणारा पाणी या बंधाऱ्यांनी अडविला आहे. या शिवाय बावनथडी नदी पात्रात आठ महिनेपर्यंत वाहणारे पात्र महिन्यावर आले आहे. राजीव सागर धरणाने पाणी अडविले आहे. यामुळे नदीचे पात्रात वाहणाऱ्या पाण्याने स्त्रोत बंदावस्थेत आले आहे.
नदीच्या काठालगत असणाऱ्या गावातून येणारे पाणी आता स्त्रोत झाले आहे. यामुळे अल्प असणारे पाणी अत्यंत आवश्यकतेचे झाले आहे. नैसर्गीक पावसावर शेतकरी धानाची रोवणी करीत असले तरी या धान पिकाला जलाशयाचे पाणी दोनदा वाटप करण्यात येत आहे.
जुलै महिन्याचा पंधरवाडा संपला असताना चांदपुर जलाशयात ३५ फुट पाण्याची साठवणूक क्षमता असताना फक्त आठ फुट पाण्याची साठवणूक झाली आहे. यामुळे येत्या पाणी वाटपाच्या अंतिम कालावधीत शेतकऱ्यांना पाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने याची वेळीच दखल घेवून वीज पुरवठा सुरू करावा. (वार्ताहर)