पायी चालण्यातून ‘ते’ देतात आगळा संदेश
By Admin | Updated: September 20, 2015 02:18 IST2015-09-20T02:18:06+5:302015-09-20T02:18:06+5:30
धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची घाई असते.

पायी चालण्यातून ‘ते’ देतात आगळा संदेश
सत्तरीतही ‘स्ट्रांँग मॅन’: इतरांसमोर आदर्श
सावरी : धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची घाई असते. म्हणूनच सायकलवरून लोक दुचाकीवर आले. दुचाकीवाले चारचाकीवर आले. पण आपल्या ७० वर्षाच्या आयुष्यात कधीही कोणत्याही वाहनाचा वापर न करणारे एक व्यक्तिमत्व आहे, असे सांगितल्यास कोणालाही खरे वाटणार नाही. मात्र असे एक गृहस्थ लोधीटोला (सावरी) येथे आहे.
चौतमल उपवंशी असे त्यांचे नाव. वयाची सत्तरी ओलांडलेले चौतमलची हे कधीच कोणत्या वाहनात बसले नाही. त्यांची जीवनशैली म्हणजे इतरांसाठी एक शिकवणच आहे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला असे आयुष्य जगणे जवळजवळ अशक्यच आहे. आपल्या घरातून शेतात किंवा गावात कुठे जायचे तर सोडा, दुसऱ्या गावाला जायचे असेल तरी चौतमलजी यांनी कोणत्या वाहनाचा वापर केलेला नाही. पायीच जाणे आणि पायीच येणे असा त्यांचा नित्यक्रम उभ्या आयुष्यभर सुरू आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गावी जाण्यासाठी त्यांना कोणाच्या सोबतीची गरज नाही. पायी निघाल्यानंतर रस्ते कोणतेही मंदिर किंवा पिंपळ, वडाचे झाड दिसले की आधी ते तिथे नतमस्तक होतात, मग पुढील प्रवास करतात. त्यांना कोणतेही व्यसन नाही. अत्यंत साधेभोळेपणा आणि प्रामाणिक जीवन जगणाऱ्या चौतमलजींचा परिसरात सर्व आदर करतात.(वार्ताहर)