काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांचे वॉक आऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:44 IST2017-09-01T21:43:17+5:302017-09-01T21:44:59+5:30
गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून केवळ राजकीय हेवेदावे काढण्यात वेळ जातो.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांचे वॉक आऊट
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून केवळ राजकीय हेवेदावे काढण्यात वेळ जातो. मूळ समस्येला बगल देण्याचे काम होत असून नवीन एलईडी लाईटच्या निविदा प्रक्रियेवरून ऐनवेळी सत्ताधाºयांनी भूमिका बदलल्याचा ठपका शुक्रवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारणसभेतून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी वॉक आऊट केले.
सुरूवातीला ठरल्याप्रमाणे विषय पत्रिकेवरील मुद्दे सोडून सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या नगराध्यक्षांमध्ये केवळ उणी-दूणी काढण्यातच दीड तास गेले. नंतर काही सदस्य व खुद्द नगराध्यक्षांनी आक्षेप घेत जुने जाऊ द्या, शहर विकासाकरिता एकत्र येऊन निर्णय घ्या, असे आवाहन केले. यावर भाजपाचे गटनेते विजय खडसे, प्रवीण प्रजापती, दिनेश चिंडाले यांनी आम्ही तीच भूमिका मांडतोय, असे सांगितले. काँग्रेस सदस्यांनी सत्ताधाºयांमध्ये एक वाक्यता नसल्याने याचा लाभ प्रशासकीय यंत्रणा घेत असून कुणावरच कुणाचा अंकुश नसल्याचा आरोप केला.
सणासुदीच्या काळात शहरातील स्वच्छतेचे नियोजन नसल्याची खंत खुद्द आरोग्य सभापती नितीन गिरी यांनी व्यक्त केली. सदस्य, पदाधिकारी अगतिक झाल्यासारखे स्वच्छतेच्या मुद्यावर भूमिका मांडत होते. नंतर सभेच्या विषय पत्रिकेवरील चर्चेला सुरूवात झाली. यात एलईडी लाईट बीओटी तत्वावर बसविण्याच्या ई-निविदेवर स्वतंत्र चर्चा होईल, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र नंतर लगेच हा विषय चर्चेचा घेऊन वाटाघाटी सुरू झाल्या. यात काँंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सत्ताधाºयांचे हितसंबध असल्याचा आरोप करून सभेतून वॉक आऊट केले.
पालिकेला केवळ १८ टक्के
एलईडी लाईट बसविणाºया कंपनीशी वाटाघाटी करून वाचलेल्या रकमेपैकी कंत्राटदार कंपनीला ८२ टक्के, तर नगरपरिषदेला १८ टक्के देण्याचे निश्चित करून ठराव मंजूर करण्यात आला. या सर्वसाधारण सभेत ३६ ठराव मंजूर झाले. नगराध्यक्ष कांचन चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय यांच्यासह विषय समिती सभापती व सदस्य सभेला उपस्थित होते.