पाईपलाईनसाठी जागोजागी नाली व खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:40 IST2019-03-10T23:38:52+5:302019-03-10T23:40:32+5:30
तिरोडा शहराचा विकास होत असतानाचा ३५ वर्ष जुनी पाईपलाईन बदलवून २७ कोटींची नवीन योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी जागोजागी नाल्या व खड्डे खोदले जात आहेत.

पाईपलाईनसाठी जागोजागी नाली व खड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तिरोडा शहराचा विकास होत असतानाचा ३५ वर्ष जुनी पाईपलाईन बदलवून २७ कोटींची नवीन योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी जागोजागी नाल्या व खड्डे खोदले जात आहेत. या नाल्या उघड्याच पडलेल्या असून त्यापासून कधीही धोका होऊ शकतो. याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष असून शहरवासीयांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. करिता त्वरीत नाल्या बुजविण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील नवीन योजनेंतर्गत पा
ण्याच्या ३ टाक्या व नवीन पाईपलाईन टाकायची आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यात मधील नाली बुजविली जाते परंतु टोकाजवळील भाग हा न बुजविता खुला ठेवण्यात येत आहे. ही नाली तीन फुट खोल व पाऊन फुट रुंद अशी असल्याने लहान मुले अथवा जनावरे यात पडल्यास जीवीतहानी होऊ शकते. प्राप्त माहितीनुसार, कंत्राटदार किंवा त्यांचे प्रमुख सकाळीच काम समजावून देतात व नंतर कधी फिरकत नाही. मजूर वर्ग आपल्या मनमर्जीनुसार कासवगतीने काम करीत असतात. कित्येक ठिकाणी नाली बुजविण्याचे काम कसे तरी केले जाते. तर कित्येक ठिकाणी नाल्या बुजविल्याच जात नाही. रहिवासी परिसर असल्याने लहान मुले, वृद्ध व नागरिक वावरतात. अशात त्यांचा अपघात होऊ शकतो. करिता तत्काळ नाल्या व खड्डे बुजविण्यात यावे अशी शहरवासीयांची मागणी आहे.
पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या नाल्या व खड्डे बुजविण्याची सूचना कंत्राटदारास देऊन खड्डे बुजविण्यास सांगते.
- सोनाली देशपांडे, न.प.अध्यक्ष
पाईपलाईनचे काम सुरु असल्याने नाली व खड्डे उघडे आहेत. ती कामे पूर्ण करीत असतानाच नाली व खड्डे बुजविण्यात यावेत याबाबत मी कंत्राटदारास सांगतो.
-जी.जी.सोनवाने, शाखा अभियंता, मजिप्रा, तिरोडा