रेल्वे चौकीला उड्डाण पुलाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:21+5:302021-03-31T04:29:21+5:30

बनगाव येथे घाणीचे साम्राज्य आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक-६ मधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात ...

Waiting for the flyover at the railway station | रेल्वे चौकीला उड्डाण पुलाची प्रतीक्षा

रेल्वे चौकीला उड्डाण पुलाची प्रतीक्षा

बनगाव येथे घाणीचे साम्राज्य

आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक-६ मधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून कचरापेटी लावण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

अनुदानाचे वाटप करण्याची मागणी

गोंदिया : गेल्या ६-७ महिन्यांपासून वयोवृद्ध निराधारांंना अद्यापही बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची मागणी आहे.

लाभापासून कर्मचारी वंचित

सडक-अर्जुनी : शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून वर्षभराचा कालावधी झाला; परंतु वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही लाभ देण्यात आला नाही.

कचरापेट्यांकडे दुर्लक्ष

केशोरी : येथील ग्रा. पं. स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकांत कचरापेट्या बसविण्यात आल्या. मात्र, या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत.

हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त

गोंदिया : शहराच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे आवागमन होत असून त्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास होत आहे. ही वाहने भरधाव वेगात धावत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.

शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी

सालेकसा : वातावरण बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास व कीटकांपासून संसर्गजन्य आजार फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोकाट जनावरांमुळे वाहतूक ठप्प

गोरेगाव : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मात्र वाहतूक ठप्प होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र

गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रावर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र या निर्देशांचे पालन केले जात नाही.

झाडे जगवा उपक्रम कागदोपत्री

पांढरी : ‘झाडे लावा-झाडे जगवा’ उपक्रम राबवून कंत्राटदाराने झाडांची लागवड केली. परंतु त्यांची जोपासना न केल्याने कित्येक झाडे वाळली असून उर्वरित मरण्याच्या अवस्थेत आहेत.

धानपिकाचे नुकसान

गोठणगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांंतर्गंत साझा क्रमांक-२६ मध्ये रानडुकरांनी हैदोस मांडला असून त्यामुळे धान पीक जमीनदोस्त झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना रानडुकर मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सालेकसा रस्त्यावरील खड्डा बुजवा

आमगाव : येथील सालेकसा रस्त्यावरील जुन्या तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा दिसून येत नसल्याने येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रवासी निवाऱ्यांची मागणी

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते; पण जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीसी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडे गावांचा समावेश येत असतो. या गावी दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते. तिरोडा आगाराची तिरोडा ते भंडारा (नवेझरी) मार्ग करडी ही बससेवा सुरू आहे. या मार्गाने दिवसभर बस धावत असतात. पण या गावी प्रवासी शेड नाहीत. त्यामुळे या परिसरातील प्रवासी हॉटेल अथवा पानटपरीत बसून एस.टी.ची वाट बघत असतात. आपला वेळ घालवत असतात याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धान पिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर होय. पण आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title: Waiting for the flyover at the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.