१० गावांत एसटीची प्रतीक्षा

By Admin | Updated: June 1, 2015 01:43 IST2015-06-01T01:43:30+5:302015-06-01T01:43:30+5:30

एसटी विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे.

Waiting for 10th ST ST | १० गावांत एसटीची प्रतीक्षा

१० गावांत एसटीची प्रतीक्षा

आमगाव : एसटी विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. देवरीवरुन साखरीटोला व्हाया वळद, सोनेखारी मार्गे ठाणा गोंदिया ही एसटी बस सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. जवळपास १० गावांत एसटीची सेवा देण्याची मागणी होत आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान अनेक वर्षांपासून होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
देवरी मार्गे साखरीटोला, वळद, पानगाव, कवडी, सोनेखारी, कटंगटोला, पिपरटोला, जांभूरटोला, आसोली, कोसमटोला, ठाणा पुढे गोंदिया अशी बस सेवा दोन फेरीत सुरू झाली तर १० गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. एस.टी. विभागाला लाख रुपये मिळतील. ठाणा येथे वळणावर गाडी मोडत नाही असे निमित्त पुढे करुन ही बस सुरू करीत नाही. काही तरी कारण समोर करुन बस सुरू न करणे म्हणजे कर्तव्यात कसूर आहे.
प्रवाशांच्या समस्येचा विचार करुन या १० गावातील नागरिकांना याचा निश्चित फायदा होईल याकरिता तत्काळ या मार्गावर बस सुरू करावी अशी मागणी किशोर रहांगडाले, जियालाल पंधरे, दीनदयाल चौरागडे व अनेक नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे मानव विकास मंडळाची बस या रस्त्यावर वळते मात्र सामान्य प्रवाशांची एसटी या मार्गावरून का वळत नाही असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Waiting for 10th ST ST