वेतन व थकबाकीसाठी शिक्षक संघाचे आमरण उपोषण
By Admin | Updated: April 8, 2015 01:27 IST2015-04-08T01:27:53+5:302015-04-08T01:27:53+5:30
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा आमगावच्यावतीने तीन महिन्यांचे वेतन व थकबाकिसाठी प्रथम साखळी उपोषण करण्यात आले.

वेतन व थकबाकीसाठी शिक्षक संघाचे आमरण उपोषण
आमगाव : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा आमगावच्यावतीने तीन महिन्यांचे वेतन व थकबाकिसाठी प्रथम साखळी उपोषण करण्यात आले. तब्बल १० दिवसानंतर शिक्षक संघाने दि. ६ एप्रिलपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
जानेवारीपासून शिक्षकाचे वेतन नाही तसेच थकीत थकबाकी व इतर समस्याबाबद शिक्षक संघाने अनेकदा निवेदन शिक्षक विभाग, जिल्हापरिषद व पंचायत समितीला देण्यात आले. मात्र कोणताच तोडगा निघाला नाही. त्यानंतर शिक्षक संघाने साखळी उपोषण सुरु केले. त्यावर प्रशासनाला जाग आली नाही. शेवटी दि. ६ एप्रिलपासून शिक्षकसंघ शाखा आमगावयांनी आमरण उपोषण सुरु केले.
त्यात जिल्हा कार्यकारिणी सदस्य डी.टी. कावळे यांच्या मार्गदर्शनात अध्यक्ष प्रकाश कुंभारे, कार्याध्यक्ष एम.झेड नांदगाये, सरचिटनिस आर.एन. उपवंशी, कोषाध्यक्ष महेश वैद्य, संयोनक एन.जी. कातकडे, बी.पी. दराडे, राजु पाटील, एच.एस. बोपचे, एन.एल. ब्राम्हणकर यांचा समावेश आहे. सोबत आर.एस. मेंढे, खोब्रागडे, एम.झेड. वैरागडे, सुधीर बाजपेयी, एम.एम. हरिणखेडे, एम.एस. क्षिरसागर, जे.आर. गणविर, ओ.टी. केवट, डी.एस. रामटेके, व्ही.बी. कळपाते, एस.पी. तलमळे, के .एम. मोटघरे, एन.आर. भांडारकर, सतीष नागपुरे, जे.डी. चौरागडे, आर.पी. बिबिनहाके यांनी उपोषण कर्त्यांना मंडपात बसुन साथ दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)