संधिसाधूंना मतदार त्यांची जागा दाखवतील

By Admin | Updated: October 7, 2014 23:36 IST2014-10-07T23:36:11+5:302014-10-07T23:36:11+5:30

गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेकडून आपल्याला जो प्रतिसाद मिळत आहे, ते प्रत्येक गावात करण्यात आलेल्या विकासकार्यांचे फळ आहे. विरूध्द पक्षांचे उमेदवार घाणेरड्या मानसिकतेमुळे व्यक्तिगत

The voters will show their seats to the culprits | संधिसाधूंना मतदार त्यांची जागा दाखवतील

संधिसाधूंना मतदार त्यांची जागा दाखवतील

गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेकडून आपल्याला जो प्रतिसाद मिळत आहे, ते प्रत्येक गावात करण्यात आलेल्या विकासकार्यांचे फळ आहे. विरूध्द पक्षांचे उमेदवार घाणेरड्या मानसिकतेमुळे व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांवर उतरले आहेत. तसेच आपला पराभव निश्चित मानून मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वागत आहेत. अशा संधिसाधूंना क्षेत्रातील मतदारच त्यांची जागा दाखवतील, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले आहे.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील कन्हारटोला (काटी), उमरी, बघोली, बाजारटोला, काटी, मरारटोला, कासार, बिरसोला, भाद्याटोला, जिरूटोला, सतोना, धामनगाव, बनाथर, वडेगाव, वडेगावटोला, कटंगटोला, बुध्दुटोला, छिपीया, कोचेवाही, चंगेरा, कोरणी, सिरपूरटोला, सिरपूर, मोगर्रा, चारगाव व अर्जुनी येथील सभेत तो बोलत होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी अग्रवाल यांनी पदयात्रा काढून जनसंपर्क साधला.
ते पुढे म्हणाले की, जनतेकडून मला उत्तम सहकार्य मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोंदियाच्या दौरावर येऊन गेले. त्यांनी ज्या शब्दांचा वापर करून प्रचार केला, ते देशाच्या प्रधानमंत्र्यांना शोभादायक नाहीत. काँग्रेस पक्षाने नेहमी विकासाचे राजकारण करून स्वातंत्र्यानंतर जवळपास ५५ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले. आज तीन-चार महिन्यांपूर्वी बनलेले प्रधानमंत्री संपूर्ण श्रेय लाटण्याचे प्रयत्न करीत आहेत. मंगळ ग्रहावर इस्त्रोव्दारे यान पाठविणे, ही काँग्रेस शासनाची देण आहे. अनेक योजना काँग्रेस शासनाने सुरू करून पूर्ण केल्या आहेत. तसेच काही योजना पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. त्या सर्वांचे श्रेयसुध्दा लाटण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करीत आहे. आजचा मतदार समजदार आहे. या सर्व बाबी तो समजू शकतो. येणाऱ्या निवडणुकीत अशा संधीसाधंूना त्यांची जागा दाखविण्याचे काम गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनता नक्कीच करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर माजी जि.प. सदस्य देवेंद्र मानकर म्हणाले की, काटी जि.प. क्षेत्रात सिंचन योजना लवकरच पूर्ण होणार आहे व शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.
भारतीय जनता पक्षाने केवळ भाषणबाजीच केली. मात्र कोणतेही विकास कार्य या जि.प. क्षेत्रात पूर्ण केले नाही. दुहेरी भूमिका साकारणाऱ्या भाजपला जनतेने त्यांची जागा दाखवून गोपालदास अग्रवाल यांना विजयी करा, असे ते म्हणाले. यावेळी भूविकास बँकेचे मुख्य प्रशासक धनंजय तुरकर यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले.
या सभांना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश रहमतकर, पं.स. सभापती सरीता अंबुले, उपसभापती चमन बिसेन, भूविकास बँकेचे प्रशासक धनंजय तुरकर, आशिष चव्हाण, बबीता देवाधारी, सूर्यवंशी, महेश साऊसकर, केशव मात्रे, राजेंद्र बोपचे, अनिल मते, मोहपत खरे, लोकचंद दंदरे, शाम कावरे, सुखराम मानकर, रवि गजभिये, राजेश माने, हेमराज देशकर, आमेष पाचे, मिर्जा जमील, सत्यम बहेकार, डॉ. होमेंद्र पटले, झाकीर खान, सचिन डोंगरे, महेंद्र घोडेस्वार, रघु येरणे, अनिल नागपुरे, मनिष मेश्राम, सूर्यप्रकाश भगत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The voters will show their seats to the culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.