मतदारांनी अनुभवले दहशतमुक्त वातावरण

By Admin | Updated: October 16, 2014 23:26 IST2014-10-16T23:26:55+5:302014-10-16T23:26:55+5:30

आमगाव-देवरी या नक्षलग्रस्त विधानसभा क्षेत्रात दहशतमुक्त वातावरणात मतदारांनी मतदानासाठी पुढाकार घेतला. देवरी व सालेकसा या तालुक्यात अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदारांनी

Voters experience panic atmosphere | मतदारांनी अनुभवले दहशतमुक्त वातावरण

मतदारांनी अनुभवले दहशतमुक्त वातावरण

आमगाव : आमगाव-देवरी या नक्षलग्रस्त विधानसभा क्षेत्रात दहशतमुक्त वातावरणात मतदारांनी मतदानासाठी पुढाकार घेतला. देवरी व सालेकसा या तालुक्यात अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढाकार घेतल्याने मतदानाची टक्केवारी समाधानकारक झाली आहे.
आमगाव-देवरी या राखीव मतदार संघात २ लाख ५२ हजार ३४० मतदार असून मतदारांनी निर्भिडपणे मतदानासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. या परीक्षेत्रात अतिदुर्गम भागात माओवाद्यांच्या दहशतीला झुंगारुन नागरिकांनी मतदान केले.
सालेकसा-देवरी या तालुक्यात दुर्गम भागातील मतदान केंद्रावर मतदान चमूने मतदानाच्याा एकदिवस अगोदर पोलीस सुरक्षा पथकासह हजेरी लावली होती. दुर्गम भाग असून सुद्धा गावातील प्रमुखांनी मतदान केंद्रावरी कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय व भोजनाची उत्तम सोय केली होती. केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत मतदान करणाऱ्या मतदारांना योग्य मार्गदर्शन करीत मतदानासाठी प्रोत्साहन केले. (शहर प्र्रतिनिधी)

Web Title: Voters experience panic atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.