भवभूती महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

By Admin | Updated: September 29, 2014 23:08 IST2014-09-29T23:08:01+5:302014-09-29T23:08:01+5:30

आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये मतदाराने आपला मतदानाचा हक्क प्रामाणीकपणे बजावून लोकशाही सुदृढ करण्यास हातभार लावावा असे आवाहन गोंदिया-भंडारा जिल्हा निवडणूक पर्यवेक्षक एल.मधुनाग केले.

Voter public awareness program in Bhavabhuti College | भवभूती महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

भवभूती महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

आमगाव : आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये मतदाराने आपला मतदानाचा हक्क प्रामाणीकपणे बजावून लोकशाही सुदृढ करण्यास हातभार लावावा असे आवाहन गोंदिया-भंडारा जिल्हा निवडणूक पर्यवेक्षक एल.मधुनाग केले.
भवभूती महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निवडणूक आयोगाचे तसेच शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन एल.मधुनाग यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. भुस्कुटे, अतिथी म्हणून आमगावचे तहसीलदार राजीव शक्करवार, जिल्हा संपर्क उपायुक्त सरोदे उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात तहसीलदार राजीव शक्करवार म्हणाले की, गावागावात खेड्यापाड्यात तसेच शहरी भागातही मतदान करतांना उदासीनता दिसून येते. ही मानसिकता बदलून प्रत्येकाने इतरांनाही मतदानास प्रेरीत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. याप्रसंगी युवाशक्तीला अभिप्रेत असलेली ई-वोटींग प्रणाली व मतदानाची सक्ती या महत्वपूर्ण बाबी शासनाने गांभीर्याने घ्याव्या असे मनोगत महाविद्यालयीन विद्यार्थी जानू अग्रवाल व रामभरोस चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भुस्कुटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, महाविद्यालयातील जवळपास ९० टक्के विद्यार्थी मतदानास पात्र आहेत. त्यानीच मतदार जनजागृतीचे महत्वपूर्ण कार्य आपल्या खांद्यावर घेवून गावखेड्यातील तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदानास प्रेरीत करावे जेणेकरून मोठ्या प्रमाणात मतदान होईल. मतदानाव्दारे लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या प्रक्रियेस भरघोष प्रतिसाद मिळेल. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रविण पठ्ठे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. विजय फुंडे, प्रा. शिंगाडे, प्रा. ठाकुर, प्रा. राणे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नायब तहसीलदार बागडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, प्रा. घोडे , प्रा. दाणी, शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Voter public awareness program in Bhavabhuti College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.