विठू माऊली तू ...

By Admin | Updated: July 16, 2016 02:03 IST2016-07-16T02:03:20+5:302016-07-16T02:03:20+5:30

आषाढी एकादशीनिमित्ताने येथील विठूरायांच्या मंदिरात शुक्रवारी (दि.१५) भाविकांची एकच गर्दी दिसून येत होती.

Vithu mauli tu ... | विठू माऊली तू ...

विठू माऊली तू ...

विठूरायांच्या मंदिरात गर्दी : भजन-पूजनाचा कार्यक्रम
गोंदिया : आषाढी एकादशीनिमित्ताने येथील विठूरायांच्या मंदिरात शुक्रवारी (दि.१५) भाविकांची एकच गर्दी दिसून येत होती. मंदिरात भजन व पूजन सकाळ पासूनच सुरू असल्याने मंदिर परिसर भक्तीमय वातारणाने न्हाऊन निघाले होते.
राज्याचे आद्यदैवत विठूरायांची आषाढी एकादशी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी करून विठू माऊलीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात. त्यानुसार आषाढी एकादशी निमित्त येथील कृष्णपुरा वॉर्डातील विठूरायांच्या मंदिरात शुक्रवारी (दि.१५) सकाळपासूनच भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
मंदिरात भजन मंडळाकडून विठू माऊलीचे भजन सुरू होते. तर भाविकांकडून विठू माऊलीचे पूजन करण्यात येत असल्याचे दिसून येत होते. आषाढी एकादशी निमित्त भविक उपवास ठेऊन विठूरायांची एकादशी साजरी करतात. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Vithu mauli tu ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.