कमी रोवणी झालेल्या गावांना भेट
By Admin | Updated: August 28, 2016 01:08 IST2016-08-28T01:08:05+5:302016-08-28T01:08:05+5:30
शुक्रवारी (दि.२६) आ. विजय रहांगडाले यांनी तिरोडा तालुक्यातील ८० टक्यांपेक्षा कमी रोवणी झालेल्या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

कमी रोवणी झालेल्या गावांना भेट
तिरोडा : शुक्रवारी (दि.२६) आ. विजय रहांगडाले यांनी तिरोडा तालुक्यातील ८० टक्यांपेक्षा कमी रोवणी झालेल्या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तालुक्यातील नवेगाव (खु.), मनोरा, मुरपार, केसलवाडा, सेलोटपार, खैरी, खेडेपार, सितेपार, कुलपा, नवेझरी, निलागोंदी व मुरमाडी या गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मग्रारोहयो या विविध राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. लाभ घेण्यासंबंधी प्रोत्साहित केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, पं.स.कृषी विस्तार अधिकारी भायदे, पं.स.सदस्य पवन पटले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, कृषी मित्र प्रमाद गौतम, तसेच संबंधीत गावातील कृषी सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रा.पं.सचिव व इतर नागरिक उपस्थित होते.