डॉ.आंबेडकर रोपवाटिकेला उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट
By Admin | Updated: October 22, 2016 00:37 IST2016-10-22T00:37:46+5:302016-10-22T00:37:46+5:30
स्थानिक अर्जुनी मोरगाव रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागामार्फत साकारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेला

डॉ.आंबेडकर रोपवाटिकेला उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट
एक लाख रोपांची निर्मिती : दोन हेक्टर जागेत विस्तार
बोंडगावदेवी : स्थानिक अर्जुनी मोरगाव रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागामार्फत साकारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेला उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.बी. शिंदे यांनी भेट दिली. रोमहर्षक फुललेल्या रोपवाटिकेला पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने अर्जुनी मोरगाव ते सानगडी रस्त्याच्या अगदी दर्शनी भागात दोन हेक्टर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेची निर्मिती मागील सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलीे. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक प्रविणकुमार बडगे यांच्या यशस्वी मार्गदर्शनातून प्रभारी सहायक लागवड अधिकारी एल.बी. लांजेवार नवनिर्मित रोपवाटिका फुलविण्याचे काम नियोजन बद्ध करीत आहेत. एकूण दोन हेक्टर जागेत विस्तार असलेल्या रोपवाटिकेत १ हेक्टर जागेमध्ये ३६ प्रजातींच्या झाडांची एक लाख रोपांची निर्मिती केली जात आहे . सहा महिन्यांत रोपांची झालेली वाढ डोळ्यातील पारणे फेडत आहे. मुख्य रस्त्यालगत नाना प्रकारची रोपे फुलून दिसत असल्याने ये-जा करणाऱ्यांना आल्हाददायक वातावरण निर्मितीची निश्चितच प्रचिती येते.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.बी. शिंदे यांनी रोपवाटिकेला भेट दिली. विस्तीर्ण अशा जागेत पसरलेल्या रोपवाटिकेचे मोठ्या बारकाईने निरीक्षण केले. स्वत: बीज संकलन करुन विविध प्रजातीच्या रोपांची निर्मिती केली जात असल्याचे उप जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
रोजगार हमी योजनेंतर्गत रोपवाटिकेचे काम केले जात आहे. प्रभारी सहाय्यक लागवड अधिकारी एल.बी. लांजेवार यांनी १५ मजुरांच्या सहाय्याने एक़ लाख रोपांची निर्मिती केली. यात मोठ्या झाडांचा जास्त समावेश असल्याची माहिती लांजेवार यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली. उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी रोपवाटिकेतील रोपांची झालेली लक्षणिय वाढ, नियोजनबद्ध बेड निर्मिती, विविध जातींचे झाडे पाहून उपजिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केला. अल्पावधीतच भरभराटीस आलेल्या रोपवाटिकेची त्यांनी प्रशंसा केली. (वार्ताहर)