डोंगरे व कुर्झेकर यांची खासदार पटेल यांच्या कार्यालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:39 IST2018-01-17T00:39:43+5:302018-01-17T00:39:58+5:30

भंडारा येथील जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कॉंग्रेसचे रमेश डोंगरे व उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली.

 Visit to Patel's office, MP from Dongre and Kurzkar | डोंगरे व कुर्झेकर यांची खासदार पटेल यांच्या कार्यालयाला भेट

डोंगरे व कुर्झेकर यांची खासदार पटेल यांच्या कार्यालयाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा येथील जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कॉंग्रेसचे रमेश डोंगरे व उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली.
याप्रसंगी त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासोबत चर्चा केली. यात डोंगरे यांनी पक्षादेशाचे पालन करून भारतीय जनता पक्षाला दूर ठेवल्याचे सांगीतले. तसेच गोंदियातील जिल्हा परिषदेतील अभद्रवर त्यांनी रोष व्यक्त करीत सत्तेपासून दूर रहा, मात्र भाजपला मदत करू नका असे आवाहनही केले. दरम्यान त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, शहर अध्यक्ष अशोक सहारे, जिल्हा उपाध्यक्ष शिव शर्मा, पवना तालुका अध्यक्ष व बाजार समिती सभापती लोमेश वैद्य, गोंदिया जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर, पवनी पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, शैलेश मयुर, माजी नगरसेवक मनोहर वालदे, नगरसेवक विनीत सहारे, ग्रामपंचायत सदस्य करण टेकाम, माजी तालुका महिला अध्यक्ष अनिता तुरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Visit to Patel's office, MP from Dongre and Kurzkar