नुकसानग्रस्त भागाला भेट

By Admin | Updated: May 1, 2016 01:44 IST2016-05-01T01:44:33+5:302016-05-01T01:44:33+5:30

जिल्ह्यात झालेल्या गारपीट व चक्रिवादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Visit to the damaged area | नुकसानग्रस्त भागाला भेट

नुकसानग्रस्त भागाला भेट

रहांगडाले यांची आढावा बैठक : अधिकारी-कर्मचारी लागले कामाला
गोरेगाव : जिल्ह्यात झालेल्या गारपीट व चक्रिवादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची नुसती पाहणी न करता प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून खरा अहवाल पाठवून त्वरीत शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शुक्रवारपासून तिरोडा क्षेत्रातील गावांची पाहणी आ. विजय रहांगडाले करीत आहेत.
२९ ला गोरेगाव तालुक्यात सकाळी ८ वाजता पासून क्षेत्रातील नुकसानग्रस्त गावे सटवा, डव्वा, चिचगाव, चिचगावटोला, गणखैरा, सोनी, दवडीपार या गावांना अधिकारी, कर्मचारी व भाजपाचे पदाधिकारी यांना घेऊन दौरा केला.
यावेळी त्यांच्यासोबत पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधू, तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनंत ठाकुर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ. विजय रहांगडाले यांनी दोन दिवसापासून सतत नुकसानग्रस्त पिकांची व घरांची पाहणी करून मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात ३० एप्रिल रोजी आढावा बैठक घेतली. शासनाला अहवाल पाठवून तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Visit to the damaged area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.