कंत्राटदारांकडून जमावबंदी आदेशाचे उल्लघंन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:20+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व परिसरात खाजगी कंत्राददारांकडून घर बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभुमीवर कलम १४४ लागू करुन ५ पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी येणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. असे असताना सुद्धा खाजगी कंत्राटदारांकडून घर बांधकामासाठी ५-१० मजूर लावून कामे करीत आहेत.

कंत्राटदारांकडून जमावबंदी आदेशाचे उल्लघंन
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेवून संपूर्ण राज्यात जमावबंदी असताना खाजगी कंत्राटदारांकडून घरे बांधून देण्याचा सपाटा सुरुच आहे. एक घर बांधून देण्यासाठी सुमारे ५-१० मजूर कामावर लावून बांधकाम सुरू असल्याने त्यांच्याकडून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन होताना दिसत आहे. यावर प्रशासनाने वेळीच दखल घेवून बांधकाम थांबवावे अशी मागणी केली जात आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व परिसरात खाजगी कंत्राददारांकडून घर बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभुमीवर कलम १४४ लागू करुन ५ पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी येणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. असे असताना सुद्धा खाजगी कंत्राटदारांकडून घर बांधकामासाठी ५-१० मजूर लावून कामे करीत आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षीत उपाय म्हणून चारचाकी, दुचाकींच्या प्रवासावर देखील बंदी घालण्यात आली आहे. अशात बांधकाम करणाºया कंत्राटदारांच्या कामावर बंदी का नसावी असा प्रश्न निर्माण होत आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने दखल घेवून खाजगी कंत्राटदारांकडून सुरु असलेले बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.