बंजारीटोलात ग्रामस्थांनी घेतली तासिका
By Admin | Updated: October 20, 2016 00:27 IST2016-10-20T00:27:46+5:302016-10-20T00:27:46+5:30
बंजारीटोला येथील प्राथमिक शाळेत शिक्षक अनुपस्थित असल्यामुळे गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांची तासिका घेतली.

बंजारीटोलात ग्रामस्थांनी घेतली तासिका
शिक्षकांची बदली करा : मुख्याध्यापकासह शिक्षकांचा हलगर्जीपणा
कालीमाटी : बंजारीटोला येथील प्राथमिक शाळेत शिक्षक अनुपस्थित असल्यामुळे गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांची तासिका घेतली.
पंचायत समिती आमगाव अंतर्गत बंजारीटोला येथील प्राथमिक शाळेत सोमवारी १०.४० मिनिट होऊन एकही शिक्षक उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी तलावाकाठी फिरत होते. सर्व प्रकार पालकांच्या लक्षात आल्यावर नागरिकांनी विद्यार्थ्यांना शाळेतील पटांगणावर एकत्रित करुन प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना गावातील सभागृहात बसवून तासीका घेण्यात आली.
या परिस्थितीची माहिती सरपंच मनिषा गौतम, उपसरपंच ठाकचंद सोनवाने यांना देण्यात आली. सदर प्रकरणाला अनुसरुन शाळा बंद आंदोलन म्हणून घोषित करण्यात आले. काही तासात ११.३० मिनिटांनी शिक्षक भेलावे हजर झाले. परंतु मुख्याध्यापक वाय.आय. बिसेन यांच्या अनुपस्थितीची कुणालाही माहिती नव्हती.
सदर गैरहजर राहण्याचे नेहमीचे कार्य मुख्याध्यापक व शिक्षकांचे असल्याने आपल्या पाल्यांना खाजगी शाळेत घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुख्याध्यापक, वाय.आय. बिसेन, शिक्षक भेलावे यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन त्यांचे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
त्यांची बदली न केल्यास आंदोलन करू असा पवित्रा शाळा समितीचे अध्यक्ष सत्यवान रहांगडाले, मनोज गौतम, तिलकचंद हनवते, सोमेश्वर सोनवाने, नरेंद्र चौधरी, योगेश हरिणखेडे, गजेंद्र बिसेन, जयचंद गौतम,रामेश्वर बिसेन, राजेंद्र रहांगडाले, दुर्गेश गौतम, सचिन पारवी यांनी घेतला आहे.(वार्ताहर)