गावकऱ्यांनी थांबविले बंधाऱ्याचे काम

By Admin | Updated: June 3, 2016 01:50 IST2016-06-03T01:45:17+5:302016-06-03T01:50:18+5:30

परिसरातील ग्राम म्हसवानी येथील नाल्यावर लघू पाटबंधारे विभाग कार्यालय आमगाव मार्फत ‘जल शिवार’ बंधाऱ्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले होते.

The villagers stopped the work of the tomb | गावकऱ्यांनी थांबविले बंधाऱ्याचे काम

गावकऱ्यांनी थांबविले बंधाऱ्याचे काम

निकृष्ठ दर्जाचे साहित्य : कंत्राटदार बदलविण्याची मागणी
पांढरी : परिसरातील ग्राम म्हसवानी येथील नाल्यावर लघू पाटबंधारे विभाग कार्यालय आमगाव मार्फत ‘जल शिवार’ बंधाऱ्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले होते. परंतु कंत्राटदारांनी दहा एम.एम. लोखंड (जंग) लावण्याऐवजी आठ एम.एम. लोखंड लावला. त्याचप्रमाणे निकृष्ठ दर्जाच्या गिट्टीचा वापर करुन काम करणे सुरू होते. त्यावेळी गावकऱ्यांच्या माध्यमातून अधिकारी बोलावून काम थांबविण्यात आले आहे.
शासनाने गुऱ्हे, जंगली प्राण्यांसाठी पाणी राहावे तसेच शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता ‘जल शिवार’ योजनेच्या माध्यमातून बंधाऱ्याची निर्मिती करण्याची योजना आखली. त्याकरिता शासन अंदाजे अठरा लाखांचा बांधकामाचा मोबदला देत असून कंत्राटदार वर्ग अधिक नफा कमविण्याकरिता निकृष्ठ दर्जाचे काम करताना दिसत आहे.
या परिसरामध्ये एका वर्षापूर्वी अशाच प्रकारचे बंधारे लघूपाटबंधारे विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने बनविण्यात आले होते. परंतु पहिल्या पावसाच्या पाण्याने बंधारे वाहून गेल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. तशा प्रकारचे बंधारे न बांधण्यात यावे याकरिता गावकऱ्यांकडून अर्धवट बंधाऱ्याचे काम थांबविण्यात आले आहेत.
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या म्हसवाणी नाल्यावरती बंधाऱ्याची चौकशी करुन बिल थांबविण्यात यावे व चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून काम करुन बंधाऱ्याची निर्मिती करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: The villagers stopped the work of the tomb