‘गावची शाळा’ प्रकल्प थंडावला

By Admin | Updated: August 31, 2015 01:31 IST2015-08-31T01:31:03+5:302015-08-31T01:31:03+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी...

The 'village school' project is thwarted | ‘गावची शाळा’ प्रकल्प थंडावला

‘गावची शाळा’ प्रकल्प थंडावला

बैठका झाल्याच नाही : शाळांमध्ये स्पर्धेचा अभाव
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘गावाची शाळा आमची शाळा’ प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून राबविला जात आहे, यातून अनेक शाळांचा दर्जाही सुधारला, परंतु या मोहीमेकडे आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे व शाळांचेही दुर्लक्ष झाले आहे.
शाळांमध्ये वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, बसण्यासाठी पुरेशी जागा, शाळेचे मैदान, व इतर सर्व सोयी सुविधा असण्यासाठी तसेच शाळेला लोेकप्रतिनिधींच्या भेटी, गावकऱ्यांच्या भेटी, शिक्षणाचा दर्जा अश्या सर्व ७५ मुद्यांच्या आधारे मुल्यांकण करण्यात आले. २०० गुणांच्या आधारे मुल्यांकण करण्यात येते.
या मुल्यांकणात सर्वाधिक गुण घेणाऱ्या शाळांना प्रभागांतर्गत प्रथम, द्वितीय, तृतीय त्यानंतर तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय तर जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येते.
सुरूवातीला फक्त एकच गटात पुरस्कार दिला जात होता. मात्र त्यात तक्रारी आल्याने वर्ग १ ते ४ असणाऱ्या शाळांचा एक गट तर वर्ग १ ते ७ चा असणारा दुसरा गट तयार करण्यात आला. मागील वर्षीपासून या दोन्ही गटांना पुरस्कार देण्यात येत आहे. दरवर्षी या मोहीमेची अमंलबजावणी सुरूवातीपासून होत होती.
परंतु यावर्षी या मोहीमेबाबत विद्यार्थी, शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग उदासिन आहे. शाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी त्या मोहीमेसंदर्भात शिक्षण विभागाने एकही बैठक घेतली नाही. दरवर्षी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीत सभा होत होत्या.
परंतु यावर्षी एकही सभा न घेतल्यामुळे गावची शाळा आमची शाळा उपक्रम सुरू आहे किंवा नाही असा संभ्रम मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोहीम सुरू राहणार आहे.
परंतु या मोहीमेच्या अमंलबजावणीसाठी शिक्षण विभाग कामाला लागला नसून उदासिन आहे. (तालुका प्रतिनिधी)
२० लाख रूपयांची तरतूद
गावची शाळा आमची शाळा या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१५-१६ या वर्षासाठी २६ आॅगस्ट रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेत जिल्हा निधीतून २० लाख रूपये या मोहीमेसाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शाळा उदासीन
सुरूवातीला या मोहीमेत रस घेऊन पुरस्कार घेण्यासाठी शाळांमध्ये चुरस दिसत करीत होती. परंतु आता गावची शाळा आमची शाळा या मोहीमेसंदर्भात उदासीनता पसरली आहे. पुरस्कार घेणाऱ्या शाळाही उदासीन आहेत.

 

Web Title: The 'village school' project is thwarted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.