विदर्भ पटवारी संघाचे अधिवेशन

By Admin | Updated: May 28, 2015 01:18 IST2015-05-28T01:18:27+5:302015-05-28T01:18:27+5:30

विदर्भ पटवारी संघ केंद्रीय कार्यकारिणी जिल्हा गोंदियाद्वारे रविवारी भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे वार्षिक अधिवेशनाची सांगता झाली.

Vidarbha Patwari Sangh's session | विदर्भ पटवारी संघाचे अधिवेशन

विदर्भ पटवारी संघाचे अधिवेशन

गोंदिया : विदर्भ पटवारी संघ केंद्रीय कार्यकारिणी जिल्हा गोंदियाद्वारे रविवारी भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे वार्षिक अधिवेशनाची सांगता झाली. उद्घाटन गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी डी.एस. सोनवाने यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष एम.यू. राजनकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
अतिथी म्हणून अ‍ॅड. पराग तिवारी, गडचिरोलीचे तहसीलदार सी.आर. भंडारी, संघाचे उपाध्यक्ष आर.पी. वैद्य, एस.पी. अनव्हाने, एन.ए. जायभाये, एन.एस. लिल्हारे, बी.डी. भेंडारकर, टी.जे. कावडे, एस.जी. पवार, श्याम जोशी, ए.एम. लांजेवार, अमरावतीचे अध्यक्ष प्रमोद राऊत, संजय डोक, अकोलाचे अध्यक्ष संदीप बोडे, हरीश निमकडे, बुलढाणाचे मनोज दांडगे, आपी माकुने, वाशिमचे व्ही.डी. गुप्ते, विनोद पुगे, यवतमाळचे जी.व्ही. सुरूसे, गडचिरोलीचे के.पी. ठाकरे, ई.एन. बारेकर, जीवन गेडाम, वर्धाचे शैलेंद्र देशमुख, श्यामराव चंदनखेडे, चंद्रपूरचे ए.एम. झाडे, संपत कन्नाके, नागपूरचे आर.एम. चुटे, नितीन बोबडे उपस्थित होते.या वेळी संघाने अन्यायाविरूद्ध लढा देण्यासाठी तत्पर राहण्याचे मार्गदर्शन केले. यानंतर आदर्श तलाठी व सेवानिवृत्त तलाठ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन पुष्पलता जायभाये यांनी तर आभार एन.एस. लिल्हारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शैलेश अंबादे, पी.बी. किल्लेदार, एस.एम. अग्रवाल, बी.एस. ठाकरे, जितेंद्र टेंभरे, एम.आर. पांडे, आय.एम. ठाकरे, एन.बी. बागडे, डी.एम. मेश्राम, एम.एस. गेडाम, पोरचेट्टीवार, गाढवे, कुंभरे, भिवगडे, पटले, तुरकर, धमगाये, पारधी, दमाहे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha Patwari Sangh's session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.