बिबट्याने केली गोऱ्ह्याची शिकार
By Admin | Updated: March 12, 2017 00:16 IST2017-03-12T00:16:34+5:302017-03-12T00:16:34+5:30
वनपरिक्षेत्र अधिकारी सडक-अर्जुनीअंतर्गत रेगेपार सहवनक्षेत्रातील कन्हारटोला/रेगेपार येथील एका शेतकऱ्याच्या

बिबट्याने केली गोऱ्ह्याची शिकार
सडक-अर्जुनी : वनपरिक्षेत्र अधिकारी सडक-अर्जुनीअंतर्गत रेगेपार सहवनक्षेत्रातील कन्हारटोला/रेगेपार येथील एका शेतकऱ्याच्या एक वर्षीय गोऱ्ह्याला बिबट्याने फस्त केल्याची घटना रात्री २ च्या सुमारास घडली.
कन्हारटोला/रेगेपार येथील व्यंकट सरजाराम कोरे यांच्या गायीच्या गोठ्यातील गोऱ्हाला जागीच ठार केले. रेंगेपार सहवनक्षेत्रातील जंगलात बिबट्याचा नेहमीच वावर असतो. गोऱ्ह्याची बिबट्याने शिकार केल्याने गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
घटनेचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांच्या मार्गदर्शनात सहवनक्षेत्र अधिकारी प्रमोद फुले, वनरक्षक संगीता काठेवार यांनी केला. उत्तरीय तपासणी पशुधन अधिकारी डॉ.कांबळे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)
पट्टेदार वाघाची दहशत
सुकडी-डाकराम : नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेला लागून रुस्तमपूर, बुचाटोला परिसरामध्ये वाघाचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपासून रुस्तमपूर, बुचाटोला, इंदोरा/निमगाव, गोविंदपूर व मंगेझरी परिसरात पट्टेदार वाघाच्या दहशतीमुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाघ मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांना नेहमी दिसतो. तो रात्रीच्या वेळी रस्त्यावर येत असल्याने रस्त्याने जाण्याची हिंमत कोणी करीत नाही.