अनेक दिवसांपासून बंद असलेले व्हेंटिलेटर झाले सुरू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST2021-04-24T04:29:37+5:302021-04-24T04:29:37+5:30
गोंदिया : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाकरिता केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे पाच व्हेंटिलेटर्स ऑगस्ट २०२० मध्ये उपलब्ध ...

अनेक दिवसांपासून बंद असलेले व्हेंटिलेटर झाले सुरू ()
गोंदिया : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाकरिता केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे पाच व्हेंटिलेटर्स ऑगस्ट २०२० मध्ये उपलब्ध झाले होते. मात्र, वारंवार पुरवठादार संस्थेस पाठपुरावा करूनदेखील तांत्रिक मनुष्यबळाच्या अभावामुळे ते व्हेंटिलेटर्स धूळखात पडले होते. ही बाब जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या लक्षात येताच त्यांनी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून हे पाच व्हेंटिलेटर्स कार्यान्वित केले आहे. यामुळे उपचार घेत असल्याने कोविड रुग्णांना याची मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करणारे गोंदिया येथील अनेक खाजगी व्यक्तींशी संपर्क साधून वि.के. बॉयोमेडिकल कंपनीचे विशाल कुर्मी यांना व्हेंटिलेटर्स बसवण्याकरिता तयार केले. विशाल यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ होकार दिला. तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात २१ एप्रिलला दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परिश्रम घेऊन हे पाचही व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करून दिले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी हे व्हेंटिलेटर्स हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याकरिता डॉ. सुगन यांना २२ एप्रिल रोजी पाठविले. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना
प्रात्यक्षिकाद्वारे व्हेंटिलेटर्स हाताळण्याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकारी आणि सहकारी यांच्या माध्यमातून तिरोडा
येथील रुग्णांच्या सोयीकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे ५ व्हेंटिलेटर्स पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत. कोरोनाच्या
महामारीत येथील जनतेस या उपकरणांचा फार मोठा आधार होणार आहे.