सागवान वाहून नेणारे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:29 IST2017-11-04T21:29:00+5:302017-11-04T21:29:25+5:30
सागवान चिरान वाहून नेणाºया टवेरा गाडीला वनाधिकाºयांनी पदमपूरच्या बाम्हणी नाल्यावर पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.

सागवान वाहून नेणारे वाहन पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सागवान चिरान वाहून नेणाºया टवेरा गाडीला वनाधिकाºयांनी पदमपूरच्या बाम्हणी नाल्यावर पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. पकडण्यात आलेल्या सागवान चिरानची किंमत ३१ हजार ५०० रूपये सांगीतली जाते.
सालेकसा येथील तीन इसम टवेरा गाडी क्रमांक एमएच २८-सी ४३९९ मध्ये सागवान चिरान टाकून विक्रीसाठी नेत होते. आमगावला ही गाडी आल्याने त्या वाहनाचा पाठलाग वनाधिकाºयांनी केला. परंतु वनाधीकाºयांना पाहून ते पदमपूरच्या दिशेने पळाले.
वनाधिकाºयांनी गाडीचा पाठलाग केला असता ते पळत असताना गाडीत बिघाड आल्याने बाम्हणी नाल्यावरील जून्या रस्त्यावर वानधिकाºयांनी गाडी पकडली. यासंदर्भात आमगाव वनविभागाने वन गुन्हा क्र.५१/२२ चे कलम ४१,४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी वाहन चालक राजेश ठाकरे, राहूल भैसारे व स्वप्नील पंधरे, सालेकसा यांना पकडण्यात आले. सदर कारवाई वनपरीक्षेत्राधिकारी पी.बी. चन्ने, एल.एस. भुते, बीटरक्षक एस.एम. पवार, वनरक्षक एच.के. येरणे, एच.के.उईके यांनी केली आहे. पकडण्यात आलेल्या सागवनाची किंमत ३१ हजार ५०० रूपये सांगितली जाते.
इतरांना रान मोकळे
आमगावच्या वनाधिकाºयांनी सालेकसा येथील सागवन वाहून नेणाºया एकाच गाडीला पकडले. परंतु या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात सागवानची तस्करी होते. याकडे मात्र अधिकारी दुर्लक्ष करतात. यावरून सागवन तस्करांसोबत वनाधिकाºयांचे साटेलोटे तर नाही ना अशी शंका ही नागरिक व्यक्त करतात. सालेकसा व देवरी भागातील सागवन गोंदियाला आणण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात.