शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

प्लास्टीक बंदीसाठी झगडणारा भाजी विक्रेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

एका तरुणाची निसर्गाप्रती आवड व जवाबदारीने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांकडून प्लास्टीकचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल. याविषयी मार्गदर्शन स्वत:च्या भाजीपाला विक्रीच्या दुकानातून गोरेगाव येथील एक भाजी विक्रेता करीत आहे.

ठळक मुद्देअभिनव उपक्रम, कागदाच्या पिशव्यांचा वापर

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : छंद, जिद्द आणि चिकाटी या तीन गोष्टी एकत्र आल्या तर कोणतेही मिशन फतेह झाल्याशिवाय राहत नाही. अशाच एका तरुणाची निसर्गाप्रती आवड व जवाबदारीने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांकडून प्लास्टीकचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल. याविषयी मार्गदर्शन स्वत:च्या भाजीपाला विक्रीच्या दुकानातून गोरेगाव येथील एक भाजी विक्रेता करीत आहे.संजय घासले असे त्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे.निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा उच्च शिक्षीत तरुणाने वयाच्या तीशीत अनेक जंगले पालथी घालत असतांना या तरुणाने जंगलातील विविध प्रजातीच्या वनस्पतीच्या अभ्यास केला.विविध रोगांवर काम करणारी औषधी, आंबाडी शरबत, बेलाचे शरबत, मोहाचे शरबत, मोहा पावडर, टोमॅटो पावडर, जामुन शिरखा, कापडी पिशवी, जामुन सिरखा, पेपर बॅग, भुईनिम, कस्तुरी पावडर, मुगना पावडर, मोहा बिस्कीट तयार करुन त्याविषयी महिला बचत गटांना प्रशिक्षण दिले. प्लास्टीकचा वापर करण्याचे काय-काय दुष्परिणाम आहे.याविषयी वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिले. गावागावातील महिलांना प्रशिक्षण दिल्यावर वनउपोजातील पदार्थ तयार होत गेले. पुढे शहरी भागात त्यांची विक्री व्हावी म्हणून निसर्ग स्टोर्सची स्थापना केली. आजघडीला निसर्ग स्टोर्समुळे नैसर्गीक खाद्य पदार्थ शहरी भागात येत आहे. त्या पदार्थाची मागणीही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील महिलांना निसर्गप्रेमी संजय घासलेमुळे रोजगार मिळत आहे.घासले यांनी निसर्ग स्टोर्स व सोबतच भाजीपाला विक्रीचे दुकान थाटले आहे. त्याच्या दुकानात गेल्यावर कुठेही प्लास्टीकचा वापर होताना दिसत नाही. दुकानाच्या अग्रभागी प्लास्टीक वापरु नका, पर्यावरण वाचवा असा संदेश लिहिलेला दिसतो. प्लास्टीकमुळे कसे दुष्परिणाम होतात.याविषयी सखोल माहिती दुकानात आलेल्या ग्राहकांना देणे, असा संजयचा नित्यक्रम आहे. चांगले विचार, चांगले संस्कार, पर्यावरणाविषयी आवड आणि संवर्धन यासाठी घासले यांनी स्वत:चे आयुष्य वाहून घेतले आहे.प्लास्टीक बंदी कागदावरचगोरेगाव नगरपंचायतच्या हद्दीत आजही पाहिजे त्या प्रमाणावर प्लास्टीक बंदी झाली नाही. नगरपंचायतीने प्लास्टीक बंदी केली असली तरी काही प्रमाणात प्लास्टीकचा वापर होताना दिसतो. त्यावर कायम अंकुश लागावे अशी संजय घासले यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक