रानभाजी विक्री महोत्सवाला सुरुवात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST2021-08-13T04:33:11+5:302021-08-13T04:33:11+5:30

जनतेत रानभाज्यांविषयी जनजागृती व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार उषा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Vegetable Sales Festival kicks off () | रानभाजी विक्री महोत्सवाला सुरुवात ()

रानभाजी विक्री महोत्सवाला सुरुवात ()

जनतेत रानभाज्यांविषयी जनजागृती व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार उषा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष एफ.आर.टी. शहा, तालुका कृषी अधिकारी अशोक पाथरीकर, दुलाराम चंद्रिकापुरे, तालुका शे.स. समितीचे सदस्य प्रभू डोंगरवार, पुष्पमाला बडोले, अलका कापगते, व्यवस्थापक राखी कहालकर, मेंढे, पलिंद्रा अंबादे, विस्तार अधिकारी उगले, म्हस्के यांच्यासह उमेदचे अधिकारी व त्यांचे सहकारी, माविमच्या सर्व सहयोगिनी, सर्व कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते. महोत्सवात तालुक्यातून बऱ्याच महिला व पुरुषांनी आपापल्या भागातील रानभाज्या विक्रीकरिता आणल्या. त्यामध्ये बांबू, लसण भाजी, कुडीची, सुरण, रानकाकडी, अंबाडी भाजी, तरोटा, रानधोपा, शेवगा, आळंबी वेगवेगळे कंद आदींचे स्टाॅल लावले होते.

Web Title: Vegetable Sales Festival kicks off ()