राष्ट्रीय चर्चासत्रात विविध वक्त्यांचे मार्गदर्शन
By Admin | Updated: November 18, 2015 01:58 IST2015-11-18T01:58:45+5:302015-11-18T01:58:45+5:30
एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संस्था संरक्षक प्रफुल्ल पटेल, ...

राष्ट्रीय चर्चासत्रात विविध वक्त्यांचे मार्गदर्शन
एस.एस. गर्ल्स महाविद्यालय : वाचनसंस्कृती जोपासणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती
गोंदिया : एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संस्था संरक्षक प्रफुल्ल पटेल, संस्थाध्यक्ष वर्षा पटेल व सचिव आ. राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात पार पडले. चर्चासत्राचा विषय ‘ इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस इन लायब्ररी एन्ड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस’ हा होता.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार होते. अतिथी म्हणून डॉ.पी.एस.जी. कुमार, अमरावती विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. मोहन खेरडे, कला शाखाप्रमुख डॉ. राजश्री धामोरीकर, गृहविज्ञान शाखा प्रमुख डॉ. माधुरी नासरे व समन्वयक प्रा. राजश्री वाघ उपस्थित होते.
बीजभाषक डॉ. कुमार यांनी वाचनालयाचे महत्त्व व स्वरूप स्पष्ट केले. डॉ. खेरडे यांनी वाचनालयाचे कार्य, निवड, साठा, संघटन व वितरण अशा विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. डॉ.एन.के. बहेकार यांनी महाविद्यालयाची परंपरा, विविध चर्चासत्रांचे महत्त्व व वक्त्यांच्या भाषणाचा सार सांगितला. प्रास्ताविक व आभार प्रा. राजश्री वाघ यांनी केले. संचालन डॉ. रेखा लिल्हारे, प्रा. संगीता शहारे, प्रा. राणी खान यांनी केले.
चर्चासत्र दोन सत्रांत विविध वक्त्यांच्या व निबंध वाचकांच्या उपस्थितीत चालले. पहिल्या सत्रात धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाचे ग्रंथालय विभागातील डॉ. गुरूनाथ हडगली, नागपूर विद्यापीठाचे डॉ. शालिनी लिहीतकर यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. संचालन प्रा. राणी खान व आभार प्रा. राजश्री वाघ यांनी मानले. दुसऱ्या सत्रात यवतमाळ येथील आबासाहेब पार्वेकर विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. माडगावकर यांनी वाचनसंस्कृती जोपासण्याऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर रायपूर येथील रविशंकर विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. सुवर्णासेन गुप्ता यांनी वाचनालयाची प्राथमिक अवस्था ते आजपर्यंतचा विकास तसेच बदलत्या काळात ग्रंथालयाचे स्वरूप व महत्त्व सांगितले. मराठी विभागप्रमुख प्रा. कविता राजाभोज व भूगोल विभागाचे डॉ. मस्करे यांनी पेपर वाचन केले. संचालन प्रा. संगीता शहारे व आभार प्रा. राजश्री वाघ यांनी मानले.
चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. अंजन नायडू, प्राचार्य डॉ. बहेकार, डॉ. राजश्री धामोरीकर, डॉ. माधुरी नासरे, प्रा. राजश्री वाघ उपस्थित होते. या वेळी डॉ. नायडू व डॉ. बहेकार यांनी ग्रंथालयांचे स्थान व कार्ये तसेच भविष्यातील योजना यावर मार्गदर्शन केले. डॉ. किशोर काळे यांनी ग्रंथालयाचे उपकरण व मिळणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. संचालन प्रा. कल्याणी राव व प्रा. राम ठाकूर यांनी केले. आभार प्रा. वाघ यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)