विविध संघटनांनी दारु विक्रीला केला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:00+5:30
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णया विरोधात संघटनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून बुद्ध जयंतीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या दारू विक्री सुरू करण्याच्या निर्णयाच्या चुकीच्या पध्दतीचा सर्व संघटनांनी एकत्रित येऊन विरोध दर्शविला. हा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

विविध संघटनांनी दारु विक्रीला केला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा प्रशासनाने बुध्द जयंतीच्या दिवशी दारु विक्रीला परवानगी दिली. याचा येथील संविधान मैत्री संघ, जिल्हा ओबिसी एससी, एसटी, व्हीजेएनटी अल्पसंख्याक संघटनांनी सोमवारी (दि.११) काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णया विरोधात संघटनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून बुद्ध जयंतीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या दारू विक्री सुरू करण्याच्या निर्णयाच्या चुकीच्या पध्दतीचा सर्व संघटनांनी एकत्रित येऊन विरोध दर्शविला. हा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, वंचित आघाडी व समता संग्राम परिषदेच्यावतीने सतिश बन्सोड, सर्वसमाज जयंती समितीचे पुरुषोत्तम मोदी, अबरार सिद्दिकी, डॉ. नामदेव किरसान, सय्यद कमर अली, वसंत गवळी, शब्बीर पठाण, कैलास भेलावे, विकल संघटनेचे शैलेंद्र गडपायले, बहुजन युवा मंच सुनील भोंगाडे, भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र मेश्राम, अबरार सिद्दीकी, रवी भांडारकर, प्रकाश, प्रकाश, परेश दुरुगवार, सुरेंद्र सोनवाने, राजू नागरीकर, उमेश दमाहे, दिनेश उके, अनिल गोंडाणे, चित्रा पाटील, आभा मेश्राम, पौर्णिमा नागदेवे, नगमा शेख, माधुरी पाटील, लक्ष्मी राऊत, सायमा खान, मीलन चौधरी, अरुण बन्नाटे, संविधान मैत्री संघ संरक्षक प्रतिमा रामटेके, माया मेश्राम, बबीता भालाधारे, गौतमा चिचखेडे आणि सामाजिक संघटनेत ओबीसी संघर्ष कृती समिती, आवामे मुस्लिम गोंदिया, आदिवासी पिपल्स फेडरेशन आदी संघटनाचा सहभाग होता.