शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या विविध सोयी

By admin | Updated: February 2, 2015 23:09 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही ३१ जानेवारीपासून कचारगड यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा ४ फेब्रुवारीपर्यंत चालेल. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा व कोणत्याही

सालेकसा : दरवर्षीप्रमाणे यंदाही ३१ जानेवारीपासून कचारगड यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा ४ फेब्रुवारीपर्यंत चालेल. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा व कोणत्याही भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तालुका स्तरीय आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याकरिता आधीच आढावा सभा खा.अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्राचे आ. संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, अतिरीक्त मुख्य कार्यपालन अधिकारी पाडवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, पोलीस उपविभागीय अधिकारी देवरे, माजी आ. भेरसिंग नागपुरे, राकेश शर्मा, जिल्हा परिषद सदस्य कल्याणी कटरे, जिल्हा परिषद सदस्य प्रेमलता दमाहे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, प्रभारी तहसीलदार कुंभरे, पं.स.चे सभापती छाया बल्लारे, उपसभापती मनोज इळपाते, माजी उपसभापती मनोज विश्वकर्मा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र घागरे, प्रभारी खंडविकास अधिकारी मडामे, उपविभागीय अधिकारी राठौड, ए.एम. बिसेन, टी.एच. तुरकर, शंकर मडावी, डॉ.जे.डी. चाटे, डॉ.डी.बी. चिमणे, तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पारी कोपार लिंगो माँ काली कंकाली देवस्थान कचारगड-धनेगाव यात्रेसंबंधात पंचायत समिती सालेकसा येथील सभागृहात यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात आली होती. विशेषत: तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांना आरोग्य सेवेबाबत नियोजन व पूर्व तयारीची जबाबदारी देऊन ती कशी राहील, याबाबतचा आढावा घेण्यात आला. यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांनी आपले नियोजन सादर केले. त्यांच्या अधिनस्त तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिजेपार, दर्रेकसा, सातगाव व कावराबांध येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूसह एकूण चार बैठे पथक स्थापीत करण्यात आले. तसेच एक फिरते पथक संपूर्ण यात्रा कालावधीत स्थापित करण्यात येईल. ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथील डॉ. महेंद्र घागरे यांची चमू व रुग्णवाहिका यात्रा स्वयंपाक कार्यालयाजवळ २४ तास उपलब्ध करून देण्यात आली. एकंदरीत ७ पथकांच्या माध्यमातून यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविक व श्रध्दाळूंना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. सदर यात्रेत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता जवळ-जवळ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, परिचर व स्वच्छक, आशा कार्यकर्ता असे एकूण ७० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जात आहे. रात्रकालीन पथक लावून सेवा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने घेवून सदर पाणी यात्रेकरूंना पिण्यायोग्य पाणी आहे किंवा नाही याची तपासणी आरोग्य सेवक व आरोग्य सहायक यांच्याव्दारे करण्यात येते. तसेच यात्रेतील उपहारगृहात पिण्याचे पाणी स्वच्छ व निजंर्तुक करून दिले जात आहे. यात्रा कालावधीत बैठे पथक व फिरते पथक आवश्यक त्या सर्व प्रकारच्या औषधे उपलब्ध करून गरज भासल्यास त्यांचा पुरवठा करण्यात येईल. प्रताप मेमोरीयल ट्रस्ट गोंदिया यांच्या रुग्णवाहिकेकडून २४ तास आरोग्य सेवेची सुविधा आहे. मोठ्या औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दर्रेकसा येथे रुग्णांची सोय करण्यात येणार आहे. दरदिवशी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचे दैनंदिन ड्युटी आदेश निर्गमित करण्यात येऊन आरोग्य सेवा पुरविण्यात येते. यात्रेनंतरही औषध फवारणी करण्यात येणार आहे. भाविकांना आजार उद्भवल्यास आरोग्य सेवा पथकांकडून सर्व प्रकारची आरोग्य सेवा पुरविण्यात येईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)