अनुसूचित जमातीसाठी मिळणार विविध लाभ

By Admin | Updated: August 11, 2016 00:18 IST2016-08-11T00:18:59+5:302016-08-11T00:18:59+5:30

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकरी तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

Various benefits to the Scheduled Tribes | अनुसूचित जमातीसाठी मिळणार विविध लाभ

अनुसूचित जमातीसाठी मिळणार विविध लाभ

गोंदिया : विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकरी तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी २०१६-१७ या वित्तीय वर्षाकरिता पात्र लाभार्थ्यांकडून आदिवासी प्रकल्प कार्यालयाने अर्ज मागविले आहेत.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात वॉटरशेड डेव्हलपमेंट करणे, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात ट्युबवेल बसविणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोगरा लागवड करणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना हळद लागवड करणे, शेततळ्याचे खोदकाम करु न प्लास्टीक विस्तरीकरण करणे, दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात दर्जेदार फळभाजीपाला विकसीत करण्यासाठी शेडनेटची उभारणी करणे व फळबाग लागवड करणे आदी योजनांचा यात समावेश आहे.तरी अनुसूचित जमातीच्या इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिचगड रोड, देवरी येथे संपर्क साधून अर्ज प्राप्त करु न घ्यावा व सर्व संबंधित दस्तावेज २६ आॅगस्टपर्यंत सादर करायचे आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी निवड समितीद्वारे ठरविलेल्या व जेष्ठतेनुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

Web Title: Various benefits to the Scheduled Tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.