शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

शिक्षकांची शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 9:28 PM

वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाला मंगळवारी (दि.२०) हिंसक वळण आले. आंदोलनातील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली.

ठळक मुद्देआंदोलन बनले हिंसक : टेबल-खुर्च्यां तोडल्या, काचही फोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाला मंगळवारी (दि.२०) हिंसक वळण आले. आंदोलनातील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात घेत ग्रामीण पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेतले.१२ वा दिवस असूनही अद्याप शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यातच आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत कसे करायचे हे विचारायला आलेल्या विद्यार्थ्यांनाच शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्यमिक) विनाअनुदानित शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत शिक्षणाधिकाºयांनी माफी मागावी यासाठी आंदोलक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यलय गाठले व शिक्षणाधिकारी यांच्यासोबत झालेल्या वादात त्या कार्यालयातील खुर्च्या-टेबलांची तोडफोड करीत टेबलावरील काचही फोडले. या प्रकारामुळे जिल्हा परिषद कार्यालयात चांगलेच वातावरण तापले व खळबळ माजील होती. होते. तसेच शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु केल्याने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले व त्यांनी जिल्हा कृती समितीचे प्रा.के.बी.बोरकर, प्रा.पी.पी.मेहर, व्ही.आर.पोगळे, जे.बी.पटले, ए.एन.कठाणे, आर. एस. जगणे, एस.डी. येळे, एम.टी. चौरे, एम.ए.उके, एम.एल.पटले, प्रतीक मेंढे यांच्यासह महिला-पुरु ष शिक्षकांना ताब्यात घेतले.आपसी समजोत्यानंतर शिक्षकांची सुटकाशिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आलेली तोडफोड बघता शिक्षणाधिकाºयांनी शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. यावर ग्रामीण पोलिसांनी शिक्षकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सायंकाळी शिक्षणाधिकाºयांविरोधात आंदोलक शिक्षकांनीही शिविगाळ केल्याची तक्रार केली. यावर पोलिसांनी शिक्षणाधिकाºयांना बोलावून घेतले. दरम्यान, त्यांच्यात झालेली चर्चा व शिक्षकांचे भविष्य उद्ध्वस्त होवू नये यासाठी तक्रार मागे घेतली. यावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिक्षकांना सोडून दिले.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र