वैष्णोदेवीचे दर्शन राहिले अपुरे
By Admin | Updated: November 8, 2014 01:25 IST2014-11-08T01:25:09+5:302014-11-08T01:25:09+5:30
गोंदिया येथून विशेष रेल्वेगाडीने वैष्णोदेवीची यात्रा करायला जाण्यासाठी स्थानिक रेल्वे स्थानकावर हजारो यात्रेकरू गोळा झाले.

वैष्णोदेवीचे दर्शन राहिले अपुरे
गोंदिया : गोंदिया येथून विशेष रेल्वेगाडीने वैष्णोदेवीची यात्रा करायला जाण्यासाठी स्थानिक रेल्वे स्थानकावर हजारो यात्रेकरू गोळा झाले. गुरूवारच्या रात्री या भाविकांसाठी एक विशेष गाडी आली. मात्र या गाडीत भोजनयान डबा नसल्यामुळे यात्रेकरूंनी रेल्वेस्थानकावर गोंधळ घातला. रेल्वे विभागाच्या विरोधात असंतोष व्यक्त करीत यात्रा न करताच यात्रेकरूंना घरी परतावे लागले.
रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे यात्रेकरूंना नाहक त्रास झाला. यात्रेचे आयोजन श्री गंज वॉर्ड मा वैष्णोदेवी सेवा समिती करते. या प्रकारामुळे या आयोजन समितीला मोठे नुकसान सहन करावे लागले. याचा फटका रेल्वे विभागालाही बसणार आहे.
विशेष म्हणजे श्री गंजवार्ड मॉ वैष्णोदेवी सेवा समिती मागील अनेक वर्षापासून कमी तिकीटमध्ये वैष्णोदेवी दर्शनासाठी विशेष गाडीची सोय करते. या वर्र्षी ६ ते १२ नोव्हेंबर दरम्यान १८ बोगी असलेल्या एका विशेष गाडीचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभरापूर्वी यासाठी बुकिंग करण्यात आली होती. यासाठी ६९ लाख रूपये रेल्वे विभागाला देण्यात आले. रेल्वेने ६ नोव्हेंबरला एक विशेष रेल्वेगाडी गोंदिया रेल्वे स्टेशनवर पाठविली. परंतु यात्रेकरू रात्री रेल्वे स्थानकाच्या प्लेटफार्म नंबर ५ वर पोहचले. त्यांनी त्या गाडीची पाहणी केल्यावर त्या गाडीत भोजनयान नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. भोजनयानच्या ठिकाणी वातानुकूलित ओवन पेन्ट्रीकार लावण्यात आली होती. त्या कक्षात फक्त भोजन को गरम व ताजे ठेवण्याची व्यवस्था होती. परंतु भोजन तयार करण्यासाठी व्यवस्था नव्हती. यामुळे संतापलेल्या यात्रेकरूंनी असंतोष व्यक्त केला. रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना बोलावून आपली तक्रार केली. परंतु यासंदर्भात आपण काहीच करू शकणार नाही, असे त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी या विशेष गाडीला शुक्रवारच्या पहाटे ३.५५ वाजता रद्द करण्यात आले. यात्रेकरू रेल्वे स्थानकावरून घरी परतले.
या घटनेची माहिती मिळताच खा. नाना पटोले रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी तब्बल तीन तास यात्रेकरूंसाठी दुसऱ्या रेल्वेगडाीची सोय करण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली. परंतु यात तोडगा निघाला नाही. विशेष म्हणजे या गाडीने वैष्णोदेवीची यात्रा करणाऱ्यांमध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश होता. रेल्वे विभागाखच्या अनागोंदी कारभारामुळे यात्रेकरूंना रात्रभर रेल्वे स्थानकावर राहावे लागले.
७ नोव्हेंबरच्या दुपारी फलाट क्र.५ चे निरीक्षण करण्यासाठी आयोजन समितीने मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आली होती. पाण्याची बॉटल, पाऊच, रजई, गादी व खाण्याचे पदार्थ तिथे आढळले. हे सर्व साहित्य आयोजकांना परत न्यावे लागले. यात्रा आयोजन समितीचे अध्यक्ष रमाकांत अग्रवाल यांच्याशी संपर्क केल्यावर ते म्हणाले, तीर्थयात्री त्या गाडीने यात्रेला गेले असते तर त्यांना खूप त्रास झाला असता.
समितीकडून १५०० यात्रेकरूंसाठी रस्त्यात भोजनाची सोय करणे शक्य नव्हते. यामुळे रेल्वेगाडी रद्द करावी लागली. यामुळे समितीला मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. ठराविक कार्यक्रमानुसार यात्रेकरूंसाठी हॉटेल व बसांची बुकिंग या आधीच करण्यात आली होती. त्या बुकिंगचे पैसे मिळणे आता शक्य नाही. (तालुका प्रतिनिधी)