रेंगेपार व पांढरवाणी येथे लसीकरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:27 IST2021-04-06T04:27:43+5:302021-04-06T04:27:43+5:30
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार व पांढरवाणी येथे रविवारी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यामध्ये ४५ ...

रेंगेपार व पांढरवाणी येथे लसीकरण ()
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार व पांढरवाणी येथे रविवारी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. लसीकरणासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत असल्याचे शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश दोनोडे यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक बघता जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. मध्यंतरी, नियंत्रणात असलेला कोरोना पुन्हा एकदा कहर करीत आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाची नितांत गरज आहे. याचाच एक भाग म्हणून रेंगेपार येथे १७८ व पांढरवाणी येथील १७१ अशा एकूण ३४९ नागरिकांना रविवारी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. कोरोनावर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही, काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नागरिकांना लसीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. दोनोडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कॅप्शन : माजी जि.प. सदस्य सरिता कापगते यांना लस देताना आरोग्य कर्मचारी.