शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

३०० वॉरियर्सच्या लसीकरणाने होणार शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST

गोंदिया : मागील वर्षभरापासून अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनावर मात करणाऱ्या लसीचे शनिवारपासून (दि. १६) लसीकरण होणार आहे. यांतर्गत, ...

गोंदिया : मागील वर्षभरापासून अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनावर मात करणाऱ्या लसीचे शनिवारपासून (दि. १६) लसीकरण होणार आहे. यांतर्गत, जिल्ह्यात १० हजार २६० लस उपलब्ध झाल्या असून पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ३ केंद्रांवर ३०० कोरोना फ्रंटलाइन वॉरियर्सचे लसीकरण करून जिल्ह्यात मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज आहे.

शनिवारी (दि. १६) कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत असून त्यादृष्टीने अवघ्या देशातच लसींचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात १० हजार २६० लस व सिरिंजचा साठा पोहोचला आहे. सर्वप्रथम आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात ८४२८ फ्रंटलाइन वॉरियर्सची यादी तयार करण्यात आली आहे. या लसीकरणासाठी जिल्ह्यात १४ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली असली तरी पहिल्या दिवशी शनिवारी येथील गोंदिया वैद्यकीय महाविद्यालय, तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी १०० म्हणजेच एकूण ३०० फ्रंटलाइन वॉरिर्यसला लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी १४ केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये १० ग्रामीण रुग्णालये, तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय, येथील बाई गंगाबाई रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय तसेच ग्राम खमारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. मात्र पहिल्या दिवशी फक्त केंद्रांवरच लसीकरण केले जाणार आहे.

-----------------------------------

मंगळवार, गुरुवार व शनिवारीच कोरोना लसीकरण

जिल्ह्यात सोमवार, बुधवार व शुक्रवारी बाळांसाठी नियमित लसीकरणाचा कार्यक्रम नियोजित आहे. अशात कोरोनासाठी मंगळवारी, गुरुवारी व शनिवार हे दिवस ठरविण्यात आले आहेत. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवारी (दि. १६) होणार असून त्यानंतर ठरवून दिलेल्या दिवशीच लसीकरण केले जाणार आहे.

--------------------------------

अफवांवर विश्वास ठेवू नका

कोरोनावरील लसीकरणासाठी शनिवारचा दिवस ठरविण्यात आला असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे लस व लसीकरणाला घेऊन अफवांवर विश्वास ठेवू नका.

- डॉ. नितीन कापसे,

जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया