मुरूमाच्या नावावर मातीचा उपयोग
By Admin | Updated: January 6, 2015 23:03 IST2015-01-06T23:03:44+5:302015-01-06T23:03:44+5:30
राज्य महामार्ग-२४९ असलेल्या सालेकसा-आमगाव मार्गावर डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठड्यालगत मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यात मुरूम कमी व मातीच अधिक

मुरूमाच्या नावावर मातीचा उपयोग
सालेकसा : राज्य महामार्ग-२४९ असलेल्या सालेकसा-आमगाव मार्गावर डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठड्यालगत मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यात मुरूम कमी व मातीच अधिक असल्याचे दिसून येते. माती मिश्रीत मुरूमाच्या वापर करण्यात येत असल्यामुळे अपघात कमी होण्याऐवजी वाढू लागले आहेत. डांबरीकरणाच्या कठड्यामुळे अनेक दुचाकीस्वार खाली कोसळले. तर दुसरीकडे मुरूम टाकणारे मुरूमाच्या नावावर माती टाकून खुलेआम भ्रष्टाचार करीत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यानंतर डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा दबते. हा रस्ता उंच होतो. त्याचप्रमाणे या रस्त्यावर पुन्हा एक-दोन वेळा नविनीकरण करण्यासाठी डांबरीकरण केल्यावर रस्ता उंच आणि दोन्ही बाजंूची जागा खाल होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला कठडे निर्माण होतात. एकाच वेळी दोन तीन वाहन जाताना किंवा दुचाकी व सायकलस्वारांना मोठ्या वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी बाजूला होवून कठड्यावर यावे लागते. अशा ठिकाणी दुचाकी वाहन घसरण्याची जास्त शक्यता असते. अपघाताचे प्रमाणसुध्दा वाढतात. कठडे अधिक उंच असले तर चारचाकी वाहनसुध्दा उलटण्याची दाट शक्यता असते.
हा सर्व प्रकार टाळण्यासाठी डांबरीकरणाच्या कठड्यालगत मुरूम टाकून सपाट करण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून केले जाते. अशाच प्रकारे काम सध्या सालेकसा-आमगाव रस्त्यावर सुरू आहे. परंतु मुरूम टाकण्याऐवजी जास्तीत जास्त माती मिश्रीत असलेले मुरूम किंवा मातीचा उपयोग सपाटीकरणासाठी करण्यात येत आहे. परंतु याचे दुष्परिणाम सामान्य लोकांना भोगावे लागत आहे. (प्रतिनिधी)