अल्पवयीन बालकाशी अनैसर्गिक कृत्य

By Admin | Updated: March 16, 2017 00:15 IST2017-03-16T00:15:52+5:302017-03-16T00:15:52+5:30

सायंकाळी घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याला पैशाचे आमिष दाखवून गावाबाहेर नेले

Unnatural act of minor child | अल्पवयीन बालकाशी अनैसर्गिक कृत्य

अल्पवयीन बालकाशी अनैसर्गिक कृत्य

अर्जुनी मोरगाव : सायंकाळी घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याला पैशाचे आमिष दाखवून गावाबाहेर नेले व त्याचेवर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना सोमवारी सायंकाळी महागाव येथे घडली. याप्रकरणी राका सदालाल मडावी या इसमावर गुन्हा नोंदविला.
सोमवारी सायंकाळी महागाव येथील एक १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थी घराबाहेरील अंगणात उभा होतो. आरोपी राका हा त्याचेजवळ गेला व माझेसोबत कबाडीच्या दुकानात चल त्याचेकडून पैसे घ्यायचे आहे. तुला २० रुपये देतो असे सांगून गावाबाहेरील पाण्याच्या टाकीजवळच्या तणसाच्या ढिगामागे घेवून गेला व आपली वासना भागविली. कुणाला सांगल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. बालकाने रात्री ८ वाजताचे सुमारास घाबरलेल्या स्थितीत वडीलांना घटनाक्रम सांगितला. मंगळवारी तक्रार करण्यात आली. यावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध बालहक्क संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४-८ तसेच ३७७, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला. पो.निरीक्षक नामदेव बंडगर व उपनिरीक्षक भाट तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Unnatural act of minor child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.