शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

परिचरांच्या नियमबाह्य बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:02 PM

जि.प.अंतर्गत ७२ परिचरांच्या ३१ मे च्या तारखेत बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदल्या नियमानुसार न करता नियमांना धाब्यावर बसवून करण्यात आल्याची ओरड कर्मचाऱ्यांची आहे.कर्मचारी संघटनांनी सुध्दा या बदली प्रक्रियेचा निषेध नोंदविला आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनांमध्ये रोष : जि.प.च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.अंतर्गत ७२ परिचरांच्या ३१ मे च्या तारखेत बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदल्या नियमानुसार न करता नियमांना धाब्यावर बसवून करण्यात आल्याची ओरड कर्मचाऱ्यांची आहे.कर्मचारी संघटनांनी सुध्दा या बदली प्रक्रियेचा निषेध नोंदविला आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गोंदिया जि.प.मध्ये मागील काही दिवसांपासून एका महिला कर्मचाऱ्याचे छळ प्रकरण गाजत आहे. कर्मचारी महिलेचा छळ करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आणि सभेत ठराव घेवून सुध्दा संबंधित छळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. उलट त्या अधिकाऱ्याला अभय दिला जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष व्याप्त आहे.हे प्रकरण ताजे असतानाच आता ७२ परिचरांच्या नियमबाह्य बदल्यांचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे जि.प.च्या कारभारावर पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर जि.प.सामान्य प्रशासन विभागाने या बदल्या नियमानुसार करण्यात आल्या असून त्याला १५ मे २०१४ च्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. पण जि.प.मध्ये २००९ पासून एकाच जागेवर कार्यरत असलेल्यांना कायम ठेवत जि.प.अध्यक्षांसह इतर विभागातील परिचरांच्या बदल्या केल्या आहेत.यात विधवा महिलेसह अपंगाचा सुध्दा समावेश आहे. विशेष म्हणजे कुठलीही तक्रार नसतांना सुध्दा या बदल्या करण्यात आल्या आहेत.ज्यांनी बदलीसाठी विनंती केली होती त्यांनाही स्थान देण्यात आले नाही.तर या बदली प्रक्रियेत दुजाभाव करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभागात २००९ पासून कार्यरत दोघांना आणि शिक्षण विभागात २०१२ व २००६ पासून कार्यरत तिघांना, पशुसंवर्धन विभागात २००४ पासून कार्यरत एकाला आणि वित्त विभागात २००४ पासून कार्यरत असलेल्या दोघांना या बदली प्रक्रियेतून सोयीस्करपणे वगळण्यात आले आहे. परिचरांमध्ये तीव्र रोष व्याप्त असून यात मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याचे बोलल्या जाते.३१ मे च्या तारखेत बदल्याजुलै महिना संपण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना ३१ मे च्या तारखेत परिचरांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदली आदेशावर जि.प.च्या जबाबदार अधिकाऱ्यांने स्वाक्षरी सुध्दा केली आहे. तर जि.प.अध्यक्ष आणि सभापतीच्या कक्षातील परिचरांच्या बदल्या करताना पदाधिकाºयांना सुध्दा विश्वासात घेण्यात आले नसल्याची माहिती आहे.काय म्हणतो १५ मे २०१४ आदेश?जि.प.सामान्य प्रशासन विभागाने १५ मे २०१४ च्या शासन निर्णयाचा आधार घेत परिचरांच्या बदल्या केल्या आहेत त्यात रिक्त पदे भरण्यास कर्मचाऱ्याची बदली करणे क्रमप्राप्त असेल तर तसेच गंभीर तक्रार सिध्द झाल्यास सीईओ आणि गटविकास अधिकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या केव्हाही बदल्या करु शकतील.जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्या ठिकाणी काम करीत असतील त्या ठिकाणाबाहेर त्यांनी बदली करण्याची विनंती केली असेल तेथे पद रिक्त असल्याशिवाय बदली करता येत नाही.विनंती करावयाच्या बदल्या या ३१ मे पूर्वी करण्याची तरतूद आहे.मात्र यानंतरही ७२ परिचरांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहे.त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पालकमंत्री दखल घेणार का?गोंदिया जि.प.मध्ये मागील काही दिवसांपासून बराच सावळ गोंधळ सुरू आहे.एका महिला कर्मचाऱ्याचे अधिकाऱ्याकडून छळाचे प्रकरण सुध्दा चांगलेच गाजत आहे. यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. तर आता परिचरांच्या नियमबाह्य बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची पालकमंत्री डॉ.परिणय फुके दखल घेतील का याकडे लक्ष लागले आहे.पदाधिकाऱ्यांवर अधिकारी वरचढजि.प.मधील महिला कर्मचाऱ्याचा एका अधिकाऱ्याकडून होत असलेल्या छळ प्रकरणाची दखल घेत जि. प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी तीन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाही करण्याचे आदेश दिले होते. तसेच यासंबंधित सभागृहात ठराव सुध्दा घेण्यात आला होता.मात्र यानंतरही कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवर अधिकारी वरचढ झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद