शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून खून; मुर्री येथील घटना, दोन आरोपींना अटक  

By अंकुश गुंडावार | Updated: January 24, 2024 19:15 IST

गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

गोंदिया: दगड आणि विटांनी ठेचून एका अनोळखी युवकाचा दोन आरोपींनी खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया शहरालगत असलेल्या मुर्री येथे उघडकीस आली. या घटनेत गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नितीन शरणागत व चंद्रमा उखरे, रा.मुर्री अशी अज्ञात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींची नाव आहे. प्राप्त माहितीनुसार गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सुशांत धारगावे हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना एमडीटीवर आर्यन चुटे याने काॅल करून मुर्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या फाटकासमोर अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली. यावरून धारगावे आणि त्यांचे सहकारी पोलिस शिपाई बाळणे यांनी घटनास्थळ गाठले.

दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत ३५ ते ४० वयोगटातील अनोखळी व्यक्ती पडलेला दिसला. त्याच्या आजूबाजूस विटाचे तुकडे पडलेले होते. त्याच्या डोक्यावर, कपाळावर, चेहऱ्यावर व शरीरावर जखमा होत्या. दगड, विटांनी चेहरा ठेचण्यात आला होता. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेतील त्या युवकाला येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा पहाटे अडीच वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी मुर्री येथील नितीन शरणागत व चंद्रमा उखरे यांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी त्या युवकाचा नेमका कोणत्या कारणामुळे खून केला, हे तपासात पुढे येईल. पुढील तपास पीएसआय सैदाने करीत आहेत. खूनाचे कारण गुलदस्त्यातमुर्री येथील दोन आरोपींना अज्ञात युवकाचा खून नेमका कुठल्या कारणावरुन केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. लवकरच या खून प्रकरणाचे रहस्य उलगडेल तसेच खून झालेल्या अज्ञात युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी