उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वाटप
By Admin | Updated: April 14, 2017 01:51 IST2017-04-14T01:51:13+5:302017-04-14T01:51:13+5:30
जवळच्या ग्राम निमगाव येथील ग्रामपंचायतच्यावतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस

उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वाटप
निमगाव ग्रामपंचायत : ७८ गरजूंना लाभ
बोंडगावदेवी : जवळच्या ग्राम निमगाव येथील ग्रामपंचायतच्यावतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत सभागृहात आयोजित गॅस कनेक्शन वितरण समारंभाप्रसंगी सरपंच देवाजी डोंगरे, विलास गायकवाड, ग्रामसेवक एल.एम.ब्राम्हणकर, इंडेन गॅस वितरक एजंसीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे, पोलीस पाटील संजय कापगते आदी प्रामुख्याने उपस्थित होते. गॅस वितरण प्रसंगी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना उपसरपंच गायकवाड यांनी, शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ जास्तीतजास्त गावकऱ्यांना व्हावा या हेतुने ग्रामपंचायतच्यावतीने शर्थीचे प्रयत्न केल्या जात असल्याचे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला जर कोणी शौचास बसणार त्यांचेवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला. गॅस वितरक कांबळे यांनी, गॅस पेटविण्याच्या तंत्राबद्दल विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी ७८ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी गॅस वितरक एजन्सी तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी लोमेश गहाणे, किशोर राऊत, ऋषी मेश्राम यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)