केवलचंद जैन यांनी ठेवला सर्वांपुढे आदर्श

By Admin | Updated: October 3, 2016 01:15 IST2016-10-03T01:15:44+5:302016-10-03T01:15:44+5:30

माजी राज्यमंत्री आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी केवलचंद जैन यांच्या निधनावर गोंदियातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला.

Uchchand Chandra Jain has put forward the ideal | केवलचंद जैन यांनी ठेवला सर्वांपुढे आदर्श

केवलचंद जैन यांनी ठेवला सर्वांपुढे आदर्श

मान्यवरांच्या भावना : देहदान करणार
गोंदिया : माजी राज्यमंत्री आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी केवलचंद जैन यांच्या निधनावर गोंदियातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या संकल्पानुसार सोमवार दि.३ रोजी अंतिम संस्कार न करता देहदान केले जाणार आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या गणेश नगर येथील निवासस्थानावरून अंतिम यात्रा निघणार आहे. ही यात्रा जयस्तंभ चौक, गांधी पुतळा चौक, गोरेलाल चौक मार्गाने नेहरू चौकात पोहोचल्यानंतर तिथे शोकसभा होणार आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द केला जाईल. अंतिम यात्रा तथा शोकसभेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, तसेच ज्या मार्गाने अंतिम यात्रा निघेल त्या मार्गावरील दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन काँग्रेसचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले.

राजकीय, सामाजिक क्षेत्रात केवलचंदजी जैन माझे पिता मनोहरभाई पटेल यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांची तत्वनिष्ठता सर्वांसाठी आदर्श अशी आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
- प्रफुल्ल पटेल
खासदार, राज्यसभा
--------------
केवलचंदजी एक सिद्धांतप्रिय आणि काँग्रेसचे निष्ठावान नेते होते. त्यांनी सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणि उच्च विचारांचे मापदंड स्थापित केले. देहदानाचा त्यांचा निर्णय प्रेरणादायी आहे.
- गोपालदास अग्रवाल
आमदार, गोंदिया
----------------
स्वातंत्र्यलढ्यातील योगदानापासून तर राजकीय नेत्यापर्यंतचे त्यांचे कार्य गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या जडणघडणीत महत्वाचे आहे. त्यांचे कार्य आम्हाला सतत प्रेरणा देत राहील.
- राजेंद्र जैन
आमदार, गोंदिया-भंडारा

Web Title: Uchchand Chandra Jain has put forward the ideal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.