दोन वर्षात सर्व लाभार्थ्यांना घरे देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:59 IST2017-08-29T23:58:42+5:302017-08-29T23:59:01+5:30
जिल्ह्यातील दलित वस्त्यांच्या विकासासाठी १० कोटीचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. यातून विविध विकास कामे करण्यात येतील.

दोन वर्षात सर्व लाभार्थ्यांना घरे देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील दलित वस्त्यांच्या विकासासाठी १० कोटीचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. यातून विविध विकास कामे करण्यात येतील. निवारा या मुलभूत सुविधेपासून अनुसूचित जातीचे कुटूंब हे वंचित राहू नये, यासाठी येत्या दोन वर्षात सर्व लाभार्थ्यांना रमाई घरकूल योजनेतून घरे बांधून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील गोपालटोली येथील रस्त्याच्या भूमीपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते बोलत होते. पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य शिला चव्हाण, पं,स.सदस्य राजेश कठाणे, जयशिला जोशी, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका भाजपा अध्यक्ष विजय बिसेन, माजी पं.स.सभापती पदमा परतेकी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.भूमेश्वर पटले, सरपंच सुनंदा उंदिरवाडे उपस्थित होते. बडोले पुढे म्हणाले, सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणात ज्यांची नावे नाहीत अशा लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येईल. दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने निकषामध्ये बदल करण्यात येतील. ज्या वस्त्यांमध्ये सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याच्या सुविधेला प्राधान्य देण्यात येईल. सोबतच सौर दिवे, समाज मंदिर, वाचनालय व इतर सोई-सुविधांची कामे देखील करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते डोंगरगाव, नवाटोला, खजरी, गोपालटोली, पांढरी, खाडीपार, मालीजुंगा व मूरपार येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी पं.स.सदस्य प्रमिला भोयर, सुधाकर पंधरे, खाडीपारचे सरपंच शोभा परशुरामकर, मुरपारचे सरपंच उमेश पंधरे व गावकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या.