चोरी करणाऱ्या दोन महिलांना पकडले
By Admin | Updated: June 22, 2017 00:16 IST2017-06-22T00:16:53+5:302017-06-22T00:16:53+5:30
सौंदड रेल्वे स्थानकावर तीन महिला चोरी करताना रंगेहात पकडण्यात आल्या.

चोरी करणाऱ्या दोन महिलांना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : सौंदड रेल्वे स्थानकावर तीन महिला चोरी करताना रंगेहात पकडण्यात आल्या. त्यातून एक महिला हिसका देवून तेथून पळून गेली. तर दोन महिला लहान मुले असल्याने मिळाल्या.
संगीता दिपू कारेमोरे (४०) रा. चिखली, भंडारा रोड, लकडगंज जि. नागपूर व दुसरी सोनू राज कारेमोरे (२५) अशी त्यांची नावे आहेत.
सौंदड रेल्वे स्थानकावर साकोली येथील रहिवासी पद्मा ताराचंद राऊत (३३) या चंद्रपूरवरुन सौंदड रेल्वे गाडीमध्ये (क्रमांक ५८८०१) दुपारी २ वाजता प्रवास करीत असताना त्यांच्या बॅगमधील काही सामान सदर दोन्ही महिलांनी काढल्याचे समजले. त्यावरुन सौंदड रेल्वे स्थानकावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलांना पकडले.