रेती वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:07+5:30

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बालाघाट रोडीवरील टी-पार्इंट येथे नाकाबंदी केली असता ग्राम आंभोरा येथील परसराम भागचंद सिंधूउके (२९) हा एमएच ३५- एई ०१८० क्रमांकाच्या ट्रॉली व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी ४०८१ मध्ये एक ब्रॉस रेती वाहून नेत असताना पोलिसांनी त्याला पकडले.

Two tractors carrying sand were caught | रेती वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

रेती वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

Next
ठळक मुद्देटी-पॉईंट व बनाथर येथील कारवाई : १४ लाखांचे ट्रॅक्टर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रामनगर व रावणवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पकडले. सदर कारवाई गुरूवारी (दि.७) सकाळी ६ वाजतादरम्यान करण्यात आली.
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बालाघाट रोडीवरील टी-पार्इंट येथे नाकाबंदी केली असता ग्राम आंभोरा येथील परसराम भागचंद सिंधूउके (२९) हा एमएच ३५- एई ०१८० क्रमांकाच्या ट्रॉली व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी ४०८१ मध्ये एक ब्रॉस रेती वाहून नेत असताना पोलिसांनी त्याला पकडले. तर रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम बनाथर येथील बाजार चौकात नाकाबंदी दरम्यान एमएच ३५-जी ७२२१ क्रमांकाच्या ट्रॉली व एमएच ३५-एफ २७०६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रॉस रेती टाकून दिपक पोतन पंधरवार (३२,रा परसवाडा,कामठा) नेत असताना त्यालाही पोलिसांनी पकडले.
पोलिसांनी या कारवाईत दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले असून त्यांची किंमत १४ लाख आठ हजार रुपये सांगितली जाते. संबंधित पोलीस ठाण्यांत सदर घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर, सहायक फौजदार गोपाल कापगते, हवालदार मधुकर कृपाण, पोलीस नायक नरेंद्र फुलबांधे, कैलाश ठाकरे, नंदकिशोर टेंभरे, रत्नशील मेश्राम व ओंकार गौतम यांनी केली.
 

Web Title: Two tractors carrying sand were caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू