दोन मोटरसायकलची धडक, दोघे ठार

By Admin | Updated: April 28, 2017 01:44 IST2017-04-28T01:44:09+5:302017-04-28T01:44:09+5:30

आमगाव तालुक्यातील गोंदिया रोडवरील किंडगीपार रेल्वे फाटक जवळील रस्त्यावर दोन मोटार सायकलमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे

Two motorcycle collides, both killed | दोन मोटरसायकलची धडक, दोघे ठार

दोन मोटरसायकलची धडक, दोघे ठार

आमगाव : आमगाव तालुक्यातील गोंदिया रोडवरील किंडगीपार रेल्वे फाटक जवळील रस्त्यावर दोन मोटार सायकलमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी आहेत. घटना २६ एप्रिलला सायंकाळी ७ वाजतादरम्यान घडली.
नंदकिशोर मेढे (३६) रा.शिवणी आणि आशिका विश्वनाथ पंधरे (६) रा.कडोतीटोला अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये देवेंद्र गोपीचंद चुटे (३२) रा.शिवणी व गणेश् रामलाल पंधरे (४५) रा.कडोतीटोला यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, गणेश पंधरे हे हिरोहोंडा प्लस मोटारसायकल क्र.एमएच ३५ एम ५६३० ने आमगाव वरुन गोरठा येथील नातेवाईकाकडे जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणारी हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एल ५९०४ ने नंदकिशोर मेंढे गोरठा येथून आमगावकडे येत असताना गोंदिया रोडवरील किंडगीपार रेल्वे फाटकजवळ दोन्ही मोटारसायकलची आमोरासमोर धडक झाली.
यात नंदकिशोर मेंढे व आशिका पंधरे हे जागीच ठार झाले असून देवेंद्र गोपीचंद चुटे रा.शिवणी , गणेश पंधरे व अनुसया पंधरे तिघे जण जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अनुसया पंधरेची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे नागपूर येथे हलविण्यात आले.
मृतदेहांचे आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्यांच्या परिवाराला सोपविण्यात आले. पुुढील तपास पोलीस हवालदार घनशाम बैस करीत आहेत. सदर घटनेची माहिती देण्यास पोलिस टाळाटाळ करीत होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Two motorcycle collides, both killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.